Chain Snatching In Ghaziabad : अनेक शहरांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. चोरीच्या वाढत्या घटना रोखताना पोलिसांच्या नाकीनऊ येत आहेत. कारण- चोरी करून चोर अशा काही ठिकाणी पसार होतात की, त्यांना शोधणे अनेकदा कठीण होऊ बसते. त्यात हल्ली रस्त्यावरून चालतानाही चोर चलाखीने लोकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, हातातील मोबाईल हिसकावून घेऊन पसार होत असल्याच्या घटना घडताना दिसतात. आता अशीच एक घटना समोर आली आहे; ज्यात बाईकवरून आलेले दोन चोर भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून फरारी होताना दिसत आहेत. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबाद शहरातील इंदिरापुरममधील वसुंधरा या भागात घडली आहे. ५ जुलै रोजी बाईकवरून आलेल्या दोन चोरांनी भरदिवसा रस्त्यावरून चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला. ही संपूर्ण घटना परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

चालत्या बसच्या दरवाजाजवळ उभी महिला, अचानक तोल गेला अन् कोसळली खाली, नंतर जे झालं फारच भयानक; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

महिलेने तत्काळ त्याच दिवशी पोलिसांत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास सुरू केला असून, आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चोर भरधाव बाईकवरून आले तेव्हा महिला रस्त्यावरून चालत होती. ती नातेवाइकांकडून घरी परतत होती. घरापासून काही अंतरावरच दोन चोरटे मागून आले आणि महिलेच्या मानेवर हात टाकून, तिच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास करीत पसार झाले. या घटनेत चोरट्यांनी सोनसाखळी ओढल्याने महिला धक्का लागून रस्त्यावर जोरात पडली. घटनेच्या वेळी तिच्या आजूबाजूलाही कोणी नव्हते. त्यामुळे चोरांनी तिथून लगेच पळ काढला. या चोरांची ओळख अद्याप पटलेली नाही.

तृतीयपंथीने भररस्त्यात उतरवली स्वत:चीच पॅन्ट अन् ई-रिक्षाचालकाला केली बेदम मारहाण; घटनेचा VIDEO व्हायरल

मात्र, महिलेने पतीसह इंदिरापुरम कोतवाली पोलिसांना या चोरीच्या घटनेची माहिती दिली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अपलोड केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला. मात्र, तुम्हीही गळ्यात सोन्याचे दागिने घालून रस्त्यावरून कुठे जात असाल, तर जरा सांभाळून जा. कारण- अशा प्रकारच्या घटना रोज समोर येत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bike borne thieves snatch gold chain of woman in broad day light causing her to collapse on road in ghaziabad uttarpradesh video goes viral sjr
Show comments