Leopard Milkman Bike Video : माणसाची वेळ चांगली असेल, तर कोणतंही संकट त्याचं काही बिघडवू शकत नाही, असं तुम्ही ऐकलं असेलच. सोशल मीडियावर यासंबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला याची खरी प्रचिती येईल. या व्हिडीओमध्ये पहाटेच्या सुमारास रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला जोरदार धडक दिल्यानंतरही दूधवाला दुचाकीस्वाराचे प्राण कसे वाचले हे तुम्ही पाहू शकता. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल त्या दूधवाल्याचे नशीब बलवत्तर होते म्हणून त्याचा जीव वाचला, अन्यथा मोठा अपघात झाला असता किंवा बिबट्याच्या हल्ल्यात त्याला जीव गमवावा लागला असता.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दूधविक्रेता कशा प्रकारे एका भीषण अपघातातून थोडक्यात बचावला आहे. ही भीषण घटना राजस्थानमधील उदयपूरमध्ये घडली आहे. जिथे पहाटेच्या सुमारास एक बिबट्या रहिवासी भागात घुसला आणि रस्ता ओलांडताना एका दूधवाल्याच्या दुचाकीला धडकला. त्यानंतर असे काही घडले की, ते पाहून तुम्हाला धक्का बसेल. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ रस्त्यावरील एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे, जो आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.

Shocking Mother's Phone Addiction Viral Video mother accidentally drops little child in dustbin while talking on phone video
अरे चाललंय काय? फोनवर बोलायच्या नादात आईनं कचऱ्याऐवजी चक्क बाळाला फेकलं; VIDEO पाहून धक्का बसेल
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Viral Video Surat
VIDEO : बीएमडब्ल्यू, मर्सिडीजसारख्या ३० अलिशान गाड्या रस्त्यावर उभ्या केल्या अन्…; शाळकरी मुलांंच्या ‘त्या’ कृत्याने सर्वच हैराण!
rinku rajguru Krishnaraaj Dhananjay Mahadik photo from Mahalaxmi Temple Kolhapur
भाजपा खासदाराच्या मुलाने शेअर केला रिंकू राजगुरूबरोबरचा फोटो, नेटकरी म्हणाले…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
next cm in delhi wont stay in sheeshmahal
Delhi CM: दिल्लीतला ‘शीशमहल’ ओस पडणार? भाजपाचे मुख्यमंत्री निवासस्थान बदलणार!
Student threatens prinicpal to kill for seizing his phone in kerala shocking video viral on social media
“बाहेर भेटलात तर मारून टाकेन”, मोबाईल जप्त केला म्हणून विद्यथ्यानं थेट मुख्याध्यापकांना दिली धमकी; VIDEO पाहून बसेल धक्का
Tanaji Sawant Son Missing
Tanaji Sawant Son Missing : तानाजी सावंतांचा मुलगा ऋषीराज सावंत सुखरुप परतला; नेमकं काय झालं होतं? पुणे पोलिसांनी दिली मोठी माहिती

ही घटना राजस्थानच्या उदयपूरमधील शिल्पग्राम मेन रोडवर रात्री ८ च्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे. जिथे एका रस्ता ओलांडणाऱ्या एका बिबट्याला एका दूधविक्रेत्याच्या दुचाकीची जोरदार धडक बसते. व्हिडीओमध्ये बिबट्या एका रहिवासी भागातील भिंतीवरून उडी मारून रस्ता ओलांडताना दिसत आहे. तो रस्ता ओलांडत असताना एक दूधविक्रेत्याची दुचाकी येऊन त्याच्यावर येऊन धडकते. त्यानंतर दूधवाला दुचाकीसह काही अंतरापर्यंत फरपटत जातो आणि खाली कोसळतो. या दुर्घटनेत बिबट्याही जखमी झाल्याने रस्त्यावर काही सेकंद पडून राहतो. बिबट्या अन् दुचाकीच्या धडकेत मोठ्या प्रमाणात दूध रस्त्यावर सांडते.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दूधवाल्याच्या दुचाकीच्या धडकेनंतर बिबट्या काही सेकंद जमिनीवर पडून राहिला. त्यानंतर तो उठला आणि तिथून पळून गेला. तर दूधवाला रस्त्याच्या मधोमध जखमी अवस्थेत पडून राहिला. यावेळी त्याच्याजवळीत सर्व दूधही रस्त्यावर सांडते. अपघातानंतर लगेचच दोन जण घटनास्थळी धावत आले; पण बिबट्याला पाहताच ते घाबरून मागे हटले. त्यानंतर तेथून जाणाऱ्या एका गाडीच्या मदतीने दूधवाल्याला सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. या भयानक अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.

Story img Loader