Bike Stunt Viral Video : सोशल मीडियावर प्रकाशझोतात येण्यासाठी काही जण जीवघेणे स्टंट्स करुन रील्स बनवत असतात. उत्तर प्रदेशमध्ये १४ जणांनी तीन दुचाकींवर सवारी करुन भन्नाट स्टंटबाजी केल्याचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्या चालकांवर कारवाई केली. दुचाकीवर स्टंटबाजीचा असाच एक खतरनाक व्हिडीओ पुन्हा एकदा इंटरनेटच्या माध्यमातून समोर आला आहे. नोएडाच्या जीआयपी मॉलजवळील एका महामार्गावर एक तरुणी दुचाकीवर खतरनाक स्टंटबाजी करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. महामार्गावर दुचाकी हवेत उडवून भन्नाट स्टंटबाजीचा करणं एका तरुणाच्या अंगलट आलं आहे. हवेत दुचाकी उडवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी कायद्याची भाषाच दाखवली आहे.
नोएडाच्या हायवेवर स्टंटबाजी करणं तरुणाला पडलं महागात, पाहा व्हिडीओ
तरुणाने नोएडाच्या महामार्गावर दुचाकी हवेत उडवून व्हिली स्टंटचा थरार प्रवाशांना दाखवण्याचा प्रयत्न केला. तरुणाची ही धोकादायक स्टंटबाजी कॅमेरात कैद झाली आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. हा व्हिडीओ पोलिसांनी पाहिल्यानंतर तातडीनं कारवाईची पावलं उचलण्यात आली. पोलिसांनी तरुणाची दुचाकी जप्त केली असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. आर्यन नावाच्या युजरने दुचाकीवर केलेल्या स्टंटबाजीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. नोएडा पोलीस विभागातील एसीपी रजनीश यांनी तरुणाची दुचाकी जप्त केल्याचा फोटो शेअर केला आहे. कायदेशीर बाबींप्रमाणे पुढीत तपास सुरु असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
इथे पाहा व्हिडीओ
उत्तरप्रदेशच्या बरेली-नैनीताल हायवेवरून तीन दुचाकींवर १४ जण प्रवास करत असल्याचा व्हिडीओही इंटरनेटवर व्हायरल झाला होता. एका दुचाकीवर सहा जण प्रवास करत असल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे. आणि इतर दोन दुचाकींवर प्रत्येकी चार जण प्रवास करत होते. रस्त्यावर केलेल्या खतरनाक स्टंटबाजीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी कारवाई करत त्या तरुणांच्या दुचाकी जप्त केल्या . पोलिसांनी या तरुणांना स्टंटबाजी करताना पाहिल्यावर ते पळून गेले. पोलिसांनी दुचाकी जप्त केल्या असून पुढील तपास सुरु असल्याचं म्हटलं होतं. रस्त्यावर दुचाकी चालवताना धोकादायक स्टंटबाजी करण्यांवर पोलीस कारवाई करत असून वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहनही करत आहेत.