Viral video: चोरीच्या अनेक घटनांचे व्हिडीओ आत्तापर्यंत तुम्ही पाहिल्या असतील. यात चोर बाईकवरून येत रस्त्यावरून चालणाऱ्या प्रवाशांच्या हातातील पर्स किंवा मौल्यवान दागिने हिसकावून काही क्षणात पसार होतात, त्यामुळे अशाप्रकारे चोरी करणाऱ्या चोरांना पकडणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असते. पण या घटनेत चोरानं कुणाची चैन किंवा पर्सची चोरी केलेली नाही तर चक्क फळगाडीवरील द्राक्षांची चोरी केलीय. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यावर लोक चांगलेच संतापले आहेत.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यावरचे द्राक्षे चोरताना दिसत आहे. रस्त्यावरील रहदारीमुळे वाहने संथ गतीने जात आहेत. त्याच बाईकवर मागे बसलेला माणूस आधी गाडीतून दोन-तीन द्राक्षे उचलण्याचा प्रयत्न करतो, पण बाईकचा वेग वाढल्याने तो संपूर्ण द्राक्षांचा घड हातात घेऊन तिथून निघून जातो. हल्लीचे तरुण मजा-मस्करीच्या नावाखाली वरचेवर नको ते प्रकार करायला जातात. अनेकदा हे त्यांच्या अंगलटही आल्याचं समोर येत, मात्र यातून धडा घ्यायचं नाव हे घेत नाहीत. याचे परिणाम मात्र त्यांना भोगावे लागतातच.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर इंटरनेट यूजर्स संतापले आहेत. @HasnaZaruriHai नावाच्या युजरने हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना यूजरने लिहिले की, ‘तुम्ही २ लाख रुपयांची बाईक खरेदी करू शकता, परंतु २० रुपयांची द्राक्षे खरेदी करू शकत नाही?’ हा व्हिडिओ आतापर्यंत ७६ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला असून लाखो व्हयूज मिळाले आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “पैशांपेक्षा शरीर जास्त महत्वाचं” चोरानं दुकानं फोडण्यापूर्वी केला योगा; VIDEO पाहून लावाल डोक्याला हात
व्हायरल व्हिडिओवर लोकांनी अशा प्रतिक्रिया दिल्या
व्हायरल झालेल्या व्हिडिओवर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘समस्या हेतूचा आहे सर’, दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘सर्व काही आधीच ठरलेले आहे, ‘ त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘सुसंस्कृत दिसत आहे.’