एका बाईकवर किती व्यक्ती बसू शकतात असे जर तुम्हाला कोणी विचारले, तर सहाजिकच आहे तुम्ही दोन असे उत्तर द्याल. एखादं लहान मुलं असेल तर तीन जण बसू शकतात. बाईकवरही दोन व्यक्तींना बसण्याची सोय असते. पण, आपल्या देशात जुगाडू लोकांची काही कमी नाही. त्यामुळे ते कुठला, कसा जुगाड शोधून काढतील सांगता येत नाही. असाच एक अतरंगी जुगाड व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एका बाईकवरून चक्क सात मुलं प्रवास करताना दिसत आहेत. एका मागोमाग एक असे सहा जण आणि एकाला मांडीवर घेऊन बसले आहेत. ही मुलं ज्या पद्धतीने बाईकवर बसली आहेत, ते पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. अशाप्रकारे एका बाईकवर बसून अख्खी कबड्डीची टीम प्रवास करतेय की असा भास होतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका स्प्लेंडर बाईकवरून सात मुलं प्रवास करत आहेत. एका मागोमाग अशी सहा मुलं या बाईकवर बसली आहेत; तर एक जण बाईकवर बसलेल्या मुलाच्या मांडीचा आसरा घेऊन बसला आहे. ही मुलं अक्षरश: जीवघेण्या पद्धतीने बाईकवरून प्रवास करत आहेत. यात चालकाच्या हातून बॅलन्समध्ये जराशीही गडबड झाली तर सर्व वाईट प्रकारे अपघाताचे बळी ठरू शकतात.

हा धक्कादायक व्हिडीओ @splendor.loversz नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो काही बाईकप्रेमींना खूप आवडला आहे. पण, अनेकांनी त्यावर संताप व्यक्त केला आहे, कारण इतक्या मुलांना एकाच बाईकवर बसवून प्रवास करणे जीवावर बेतू शकते. या व्हिडीओवर एका युजरने कमेंट करत लिहिले की, स्प्लेंडरची पॉवर, तर आणखी एकाने लिहिलेय की, हे कमी आहेत, एक अजून बसवला पाहिजे होता. तर काहींनी लिहिलेय, भाऊ यापेक्षा एक गाडी घेऊन टाक. या व्हिडीओवर तुमची काय प्रतिक्रिया आहे, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.