वाहतूकीचे नियम हे वाहनचालकांच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठीच असतात पण कोणीही या नियमांचे पालनच करत नाही. रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांपासून वाहन चालवणाऱ्यांपर्यंत सर्वच जण वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात ज्यामुळे अनेकदा थरारक अपघात होतात. वाहतूक नियमांचे पालन करणे का महत्त्वाचे हे दर्शवणारा असाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एका दुचाकीस्वाराने रस्ता ओलांडणाऱ्या चार शाळकरी मुलींना उडवले आहे. हा व्हिडिओ अंगावर काटा आणणारा आहे.
वाहन चालवताना नेहमी वेगावर नियंत्रण ठेवण्यास सांगितले जाते विशेषत: शाळा, रुग्णालयाजवळून जाताना वेगाने नियंत्रण ठेवणे आवश्यक असते तरीही लोक भरधाव वेगाने वाहन चालवताना दिसतात तर अनेकदा रस्ता ओलांडताना पादचारी वाहतूक नियमांचे पालन करत नाही त्यामुळे अनेकदा अपघात होतात अशाच चुकांमुळे झालेल्या अपघाताचा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये शाळेजवळील परिसरामध्ये दुचाकीस्वार भरधाव वेगाने वाहन चालवत आहे तर रस्ता ओलंडणाऱ्या शाळकरी मुली दोन्ही बाजूला न पाहताच रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करताना दिसतात ज्यामुळे हा अपघात होतो.
व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता की, सुरुवातीला काही शाळकरी मुली रहदारीच्या रस्त्याच्या बाजूला उभ्या आहेत ज्या रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे. वाहनांची ये-जा सुरु आहे. थोडीशी रहदारी कमी होताच शाळकरी मुली रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्यावर येतात त्याचवेळी भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वारीची दुचाकी घसरते आणि तो रस्त्यावर पडतो. त्याच्या दुचाकीचा वेग इतका असतो की पडल्यानंतरही दुचाकी आणि दुचाकीस्वार फरफडत काही अंतरापर्यंत जातात आणि रस्ता ओलांडणाऱ्या शाळकरी मुलींना जाऊन धडकतात. धडक इतकी जोरात बसते की शाळकरी मुली अक्षरश: हवेत उडून जमिनीवर पडतात. काही समजण्याच्या आत रस्त्यावर थरारक अपघात होतो. सीसीटिव्हीमध्ये अपघात कैद झाला असून ३१जानेवारी २०२५ रोजी दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी घडल्याची माहिती व्हिडीओच्या कोपऱ्यात दिसते आहे. पण अपघात नक्की कुठे घडला याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर roadsafetycontent नावाच्या पेजवर पोस्ट केला जात आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, रस्त्यावर बदलत्या परिस्थितीनुसार सावरायला वेळ मिळेल इतका वाहनाचा वेग असावा. वाहन चालवताना तुमची एक चूक तुमचं आणि इतरांचं कुटुंब उध्वस्त करू शकते.”
व्हिडिओवर कमेंट कर अनेकांनी दुचाकी स्वारावर रोष व्यक्त केला आहे. एकाने कमेंट केली की,
“एवढे लिहिले असते की पुढे शाळा आहे, वाहनाची गती कमी ठेवावी”
दुसऱ्याने कमेंट केली की, एवढा विचार करत नाहीत वाहनचालक मग अपघात होतात. सावधानता बाळगली पाहिजे.
तिसऱ्याने कमेंट केली की, “काय फालतू ड्रायव्हर आहे.”