Bike Theft Viral Video : चोरीच्या अनेक घटना रोज घडताना पाहायला मिळतात. अशाच एका मजेदार चोरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, व्हिडीओमध्ये बाईकवरून आलेले दोघे जण दुसऱ्याची बाईक बंदुकीचा धाक दाखवून पळवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही वेळासाठी अगदी भीतीदायक वातावरण निर्माण होते. पुढे काय होतंय हे पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच पुढच्या काही मिनिटांत संपूर्ण चित्र पालटते. पुढे काय घडले हे पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. या थरारक चोरीच्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण आपली बाईक रस्त्याच्या कडेला थांबवत खाली उतरून जात असतो. तितक्यात एका बाईकवरून दोघे जण त्याच्या दिशेने येतात. नंतर त्यातील एक जण खाली उतरतो आणि त्या तरुणाला बंदुकीचा धाक दाखवत त्याची बाईक चोरी करण्याचा प्रयत्न करतो. हे पाहून तरुण घाबरतो आणि त्यांना चावी देऊन टाकतो. हे सारं चित्र पाहून मनात धडकी भरू लागते. यानंतर चोरटा बाईकवर बसतो आणि ती सुरू करण्याचा प्रयत्न करतो.

चोरीच्या घटनेचा थरारक व्हिडीओ

अशाप्रकारे तो बाईक पळवून नेणार असं काही मिनिटांसाठी वाटतं, पण काही सेकंदात संपूर्ण चित्रच बदलून जातं. चोरट्याचे नशीब खराब की काय, दुचाकी सुरूच होत नाही. काही सेकंद प्रयत्न करूनही बाईक सुरू झाली नाही, त्यामुळे त्याने बाईक सोडून पळून जाण्याचा विचार केला. पण, काही समजण्याच्या आत अचानक तिथे अनेक तरुण धावत येतात आणि ते चोरट्याला रंगेहाथ पकडतात. यानंतर त्याला बेदम मारहाणही केली जाते. त्याला इतकं मारतात की त्याची अवस्था बिकट करून टाकतात. पण, या परिस्थितीत त्याचा साथीदार मात्र त्याला एकटं सोडून बाईकवरून पळून जातो. त्यामुळे त्या तरुणाची बाईक चोरी होण्यापासून वाचते.

Read More Trending News : Video: रेल्वे मंत्र्यांचा सीएसएमटी ते भांडुपपर्यंत लोकलने प्रवास, लोकांनी वाचला तक्रारींचा पाढा; म्हणाले, “ट्रेन नाही…”

या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ @yeah_baby___ नावाच्या एक्स अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे, जो आता अनेक सोशल मीडिया साइट्सवर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. काही जणांनी तरुणाच्या मदतीला धावून आलेल्या मित्रांना पाहून म्हटले की, अशीच असते मुलांची मैत्री; तर काहींनी चोराची खतरनाक धुलाई केल्याचे म्हटले आहे, तर काही जण भारी व्हिडीओ होता, अशा कमेंट्स करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bike theft video the person who snatched bike at gunpoint was beaten up badly the video going viral sjr