Bike Accident Viral Video :  सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. विशेषत: भारतात मागील काही दिवसांपासून रस्ते अपघाताच्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळते. काही अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही दुसऱ्यांच्या चुकीमुळे घडतात. त्यामुळे चूक नसतानाही अनेकदा चालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून अक्षरश: तुमच्या अंगावर काटा येईल. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की, वाहनचालकांनी किती सतर्क असले पाहिजे. व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा, या अपघातामध्ये नेमकी चूक कुणाची आहे?

रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांत वेळोवेळी बदल केले जातात. पण, अनेक चालक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत आणि अपघात होतात. अशावेळी चूक नसतानाही दुसऱ्याला जीव गमवावा लागतो. या अपघाताच्या व्हिडीओतही असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. दोन पदरी रस्त्यावर जेमतेम पाच-सहा बाईक्स दिसतायत, ज्या आरामात अंतर ठेवून जात होत्या. याचवेळी अचानक पाठीमागून भरधाव वेगाने एका स्कुटीवर दोन तरुण येतात आणि पुढच्या बाईकला कट मारून निघून जातात. पण, त्याच्या मज्जा मस्तीच्या नादात दोन बाईक्समध्ये भीषण अपघात होतो, ज्यात दोन्ही बाईक्सवरील चार लोक अक्षरश: चालत्या बाईकवरून जोरात खाली कोसळतात. ज्या बाईकला कट मारून तरुण निघून गेला ती बाईक तर कोसळलीच, शिवाय तिच्या धक्क्याने आणखी एक बाईकदेखील कोसळली. यावेळी दोन्ही बाईकवरील तरुण रस्त्यावर उडून खाली कोसळतात.

youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
monali thakur leave the live concert
Video : प्रसिद्ध गायिकेने ‘या’ कारणामुळे अर्ध्यावर सोडला वाराणसीमधील कॉन्सर्ट, चाहत्यांची माफी मागत म्हणाली; “बेजबाबदार लोकांवर…”
Shocking video A car drags a cow calf walking across the road for 200 meters watch what happened next
सांगा चूक कोणाची? कारने रस्त्यावरून चालणाऱ्या गायीच्या वासराला २०० मीटरपर्यंत ओढत नेले; VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
Shocking video Suv overturned 8 times nagaur bikaner highway accident Live video
याला काय म्हणाल नशीब की चमत्कार? ८ वेळा पलटली SUV कार; समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Lakaht Ek Aamcha Dada
Video : “गावासमोर धिंड काढली नाही, तर…”, तुळजाचे डॅडींना चॅलेंज; नेटकरी सल्ला देत म्हणाले, “काहीही करून तुमचं नातं…”
a child girl cried as young girl asked questions to her
VIDEO : तरुणीचा प्रश्न ऐकताच चिमुकली ढसा ढसा रडायला लागली.. नेटकरी म्हणाले, “थेट काळजावर..”

रस्त्यावर केलेली मज्जा मस्ती कशी बेतली दुसऱ्याच्या जीवावर, पाहा व्हिडीओ

Read More Trending News : VIDEO : पै-पै जोडून उभा केलेला संसार अक्षरश: पाण्यात; घाटकोपरमधील मनाला चटका लावणारे दृश्य

दोन बाईकवरील जवळपास चार लोक रस्त्यावर वेगवेगळ्या दिशेला फेकले जातात. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. @maharashtra_rto_official नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय की, “रस्त्यावर केलेली मजाक मस्ती दुसऱ्याच्या जिवावर बेतू शकते.” दरम्यान, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की, रस्त्यावरून वाहन चालवताना तुम्ही किती सावधगिरी बाळगली पाहिजे. अनेकांनी या व्हिडीओवरून नंतर लोकांना गाडी सावधगिरीने चालवण्याचे आवाहन केले आहे.

Story img Loader