प्रसिद्धीसाठी आजकाल लोक काय करतील याचा नेम नाही. सार्वजनिक ठिकाणी जसे की मेट्रो, रेल्वेस्टेशनवर नाचताना किंवा स्टंट करताना अनेक व्हिडीओ पाहिले असतील. एवढंच काय मेट्रोमध्ये बिकिनी परिधान करून प्रवास करणाऱ्या तरुणींचे व्हिडीओ यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मेट्रो, रेल्वेनंतर आता बसमध्ये असे प्रकार करण्यास सुरुवात केली आहे. नुकताच बसमध्ये बिकिनी परिधान करून प्रवास करणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दिल्लीत गर्दीने भरलेल्या बसमध्ये एका महिलेचा बिकिनी परिधान करून प्रवास करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये बसमधील प्रवाशांच्या प्रतिक्रिया देखील पाहायला मिळत आहे. बसमध्ये बिकिनी घालून प्रवास करणाऱ्या महिलेला पाहून काहींना धक्का बसला आहे आणि त्याला “अश्लील कृत्य” असे म्हटले, तर काहींनी असा युक्तिवाद केला की, “ती महिला तिला हवे ते कपडे परिधान करू शकते ही तिची निवड आहे.

व्हिडीओ एक्सवर @DeepikaBhardwaj नावाच्या खात्यावरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना हे नक्की काय घडत आहे असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, एक महिला बिकिनी परिधान करून बसमध्ये चढते. तिला पाहून ओशालेली महिला प्रवासी तिच्यापासून लांब दुसरीकडे जाऊन उभी राहते. व्हिडीओमध्ये महिलेच्या शेजारील सीटवर बसलेले आणखी काही प्रवासी आपली जागा सोडून दुसरीकडे जात असल्याचे दिसते.

व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ आतापर्यंत ५.३ लाख लोकांनी पाहिला आहे. हा आकडा आणखी वाढत आहे. व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया देखील आल्या आहेत. काहींनी महिलेच्या कृतीची निंदा केली तर काहींनी महिलीच्या कृतीचे समर्थन केले. तर महिलेची खिल्ली उडवणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा – गुलाबी सायकल अन् तिच्या चेहऱ्यावरील आनंद! स्वयंपाकीण ताईचे कष्ट वाचवण्यासाठी व्यक्तीने केली खास मदत, Viral Video

व्हिडीओवर लोकांनी काय दिल्या प्रतिक्रिया

एकाने महिलेची खिल्ली उडवत म्हटले की, कदाचित ही महिला Get Redy With Me असा ट्रेंड बसमध्ये सुरु करते आहे. तुमच्या माहितीसाठी Get Redy With Me हा ट्रेंड सोशल मीडियावर आधीपासून व्हायरल आहे जिथे काही इन्फ्लुएन्सर्स कोणते कपडे परिधान करावे पासून कसा मेकअप करावा याची माहिती देतात.

हेही वाचा –पैशासाठी काहीपण! मृत काकांना व्हिलचेअरवर घेऊन बँकेत पोहचली महिला अन्….धक्कादायक घटनेचा Video Viral

व्हिडीओ पाहून धक्का बसलेला एक व्यक्ती म्हणाला, “का? काय फालतूगिरी आहे”

तिसरा व्यक्ती महिलेच्या समर्थनात म्हणाला की, “हे तिचे शरीर आहे आणि तिची निवड आहे. तिला एकटं सोडा”