सोशल मीडियावर निरनिराळे व्हिडीओ व्हायरल येत असतात. यामध्ये मजेशीर, विचित्र, धक्कादायक, स्टंट व्हिडीओ पहायला मिळतात. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी अनेकदा लोक काहीही करायला तयार असतात. दरम्यान फोटोसाठी तर लोक वेडे आहेत. प्री वेडिंग फोटोशूट, लग्नानंतर फिरायला गेल्यावर फोटोशूट कपल्स करत असतात. यावेळी फोटोंसाठी लोक काहीही करतात, अशावेळी ते आपल्या जीवाचीही पर्वा करत नाहीत. फोटोग्राफरही त्यांच्यामध्ये अशावेळी सामील होतात, असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
फोटोग्राफरने केलं असं काही की…
हा व्हिडिओ बालीचा आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ज्यात एक तरुणी बिकिनी घालून झऱ्याखाली उभी आहे, आणि एक टूर गाईड जोडप्याला पोज द्यायला शिकवत आहे. टूर गाईड जोडप्याला धबधब्याखाली फोटो कसे काढायचे हे शिकवत आहेहा गाईड वेगवेगळ्या प्रकारच्या भन्नाट पोसेस शिकवत आहेत. या पोस बघून तुम्हाली हसू आवरणार नाही.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा – Video: एका लग्नाची अजब मिरवणूक! नवरदेवाला घोड्यावर बसवलं अन् घोड्याला खाटेवर चढवलं
हा व्हायरल व्हिडिओ @yammi नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ६ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.