Victoria Falls Viral Video: सोशल मीडियावर प्रकाशझोतात येण्यासाठी एका बिकीनी गर्लने धबधब्याच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. जवळपास ३८० फूट खोल दरीत असलेल्या व्हिक्टोरिया धबधब्याच्या उंच टोकावर खरतनाक स्टंटबाजी करतानाचा एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जगातील सर्वात मोठ्या धबधब्यांपैकी एक असणाऱ्या व्हिक्टोरिया धबधब्याचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. झांम्बीया-झिम्बाब्वेच्या सीमेवर असणाऱ्या या धबधब्यावर एका तरुणीने उंच टोकावर जाऊन पाण्यात पोहण्याचा जीवघेणा खेळ केला. हा संपूर्ण थरार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

विनाशकाले विपरीत बुध्दी सुचली अन् तरुणी थेट गेली व्हिक्टोरिया धबधब्यावर

हा थरारक व्हिडीओ @weirdterrifying नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड गाजला असून तब्बल १९ मिलियन व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर युजरने कॅप्शनमध्ये म्हटलंय, “३८० फूट खोल धबधब्याच्या जवळ गेल्याचा अनुभव घेतला. डेविल्स पूल- व्हिक्टोरिया फॉल्स.” व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देताना या व्हिडीओवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. तो म्हणाला, कॅमेरात तरुणीच्या पायाचा भाग शूट करण्यात आला नाही. “तिच्या पायाला दोर बांधलेला असण्याची शक्यता आहे.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटलं, “फोटो काढण्यासाठी धबधब्याच्या उंचावर गेल्यावर काही जणांचा पाय घसरून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्यात.” “मला हा थरारक व्हिडीओ पाहताना खूप भीती वाटली”, असं अन्य एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे.

Nitrate-rich groundwater in Wardha district
धक्कादायक! वर्धा जिल्ह्यातील भूगर्भात नायट्रेटयुक्त पाणी, कर्करोगासह विविध आजार…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
IShowSpeed performs daring backflip on Guatemalas Hand of God‘You have to stop risking your life for these reels
१७ सेकंदाच्या व्हिडीओसाठी युट्युबरने गमवला असता जीव! ‘हँड ऑफ गॉड’वर केली स्टंटबाजी, थरारक Video Viral
Mumbai: Worker Attempts Suicide Twice in Vikhroli, Saved by Safety Nets After Jumping From 13th Floor video goes viral
मुंबईतल्या विक्रोळीमध्ये मजुराची १३व्या मजल्यावरुन उडी; दोनदा जाळीत अडकला अन् शेवटी…VIDEO पाहताना तुम्हीही रोखून धराल श्वास
Chandrapur District , Junona Ballarpur route, tiger ,
VIDEO : जेव्हा जंगलाचा राजा आला रस्त्यावर…
Taloja MIDC road accident
Video : तळोजातील अपघातामध्ये एक ठार, महिला अत्यवस्थ
almost falls off cliff
उंच कड्यावर चढता चढता ती अचानक घसरली, खोल दरीत कोसळणार तेवढ्यात…. हृदयाचा थरकाप उडवणारा Video Viral
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…

नक्की वाचा – Video: सुसाट स्पोर्ट्स बाईक चालवणाऱ्या तरुणीने हायवेवर तरुणाला दिली धडक, रायडिंगचा थरार होतोय व्हायरल

इथे पाहा व्हिडीओ

धबधब्यावर जाऊन रील्स बनवून इंटरनेटवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण जीव धोक्यात टाकतात. सेल्फी काढताना पाय घसरून खोल दरीत पडून काही लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. या तरुणीनंही शेकडो फूट उंचीवर असेलेल्या व्हिक्टोरिया धबधब्यावर जाऊन जीवघेणा स्टंट करण्याचा नाद केलाय. पण असे धोकायदायक स्टंट अनेकदा अशा माणसांच्या जीवावर बेततात. पण या तरुणीला स्टंटबाजी करताना जराही भीती वाटली नाही, असंच हा व्हिडीओ पाहिल्यानंतर म्हणता येईल. हा थरारक व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनीही खतरनाक स्टंटबाजी करण्याच्या कृत्याला प्रतिक्रियांच्या माध्यमातून विरोध दर्शवला आहे.

Story img Loader