बिकिनी किलर या नावाने ओळखला जाणारा कुख्यात सीरियल किलर १९ वर्षांनी तुरुंगाबाहेर आला आहे. नेपाळच्या सुप्रीम कोर्टाने चार्ल्स शोभराजला सोडण्याचे आदेश दिले होते. बुधवारी हे आदेश देण्यात आले होते त्यानंतर आज चार्ल्स शोभराजची सुटका करण्यात आली आहे. चार्ल्स शोभराज लवकरच त्याच्या मायदेशी म्हणजेच फ्रान्सला परतणार आहे.

२००३ मध्ये झाली होती जन्मठेपेची शिक्षा
चार्ल्स शोभराजला २००३ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र आता शोभराज ७८ वर्षांचा झाला आहे. त्याच्या वयाचा विचार करून नेपाळच्या सुप्रीम कोर्टाने त्याला तुरुंगातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला. आज चार्ल्स शोभराज तुरुंगाबाहेर आला आहे.

Bollywood Artists News, Marathi news
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानच नाही तर सलमान खान, रवीना टंडन यांच्यासह ‘या’ कलाकारांवरही झाला होता हल्ला
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
27 yearold woman raped by minor
अल्पवयीन मुलाकडून महिलेवर बलात्कार
thane police arrest
कल्याणमधील पत्रीपुलाजवळ प्रतिबंधित कोडीन औषधाच्या बाटल्या जप्त
kidnap attempt of girl Lonavala, girl ,
लोणावळ्यात दोन वर्षीय चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न; अपहरणकर्त्याला पालकांनी दिला चोप
14 year old girl pregnant loksatta news
Nagpur Crime News: १४ वर्षांची मुलगी तीन महिन्यांची गर्भवती, प्रियकराविरुद्ध गुन्हा
Maha Kumbhmela 2025
Maha Kumbh Mela 2025: १४४ वर्षांनंतर येणारा महाकुंभमेळा का महत्त्वाचा? कारण काय?
Kalyan elder brother killed younger brother dispute
कल्याणमध्ये ५०० रूपयांच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावाचा खून

कोण आहे चार्ल्स शोभराज?
चार्ल्स शोभराजची आई व्हिएतनामची आहे तर वडील भारतीय आहेत. शोभराजचा जन्म ६ एप्रिल १९४४ ला व्हिएतनामच्या सायगॉनमध्ये झाला. त्यावेळी व्हिएतनामवर फ्रान्सने कब्जा केला होता. व्हिएतनामवर फ्रान्सचा कब्जा असल्याने शोभराजकडे फ्रान्सची नागरिकता आहे. चार्ल्स शोभराजला द सर्पेंट आणि बिकिनी किलर या दोन नावांनीही ओळखलं जातं. शोभराजवर १९७० च्या दशकात १५ ते २० हत्या केल्याचा आरोप आहे.

वेश बदलण्यात पटाईत आहे शोभराज
वेश बदलण्यात आणि पोलिसांना गुंगारा देण्यात चार्ल्स शोभराज पटाईत आहे. चार्ल्स शोभराच हा विदेशी पर्यटकांना आपलं लक्ष्य बनवत असे. त्याच्यावर २० पेक्षा जास्त हत्या केल्याचा आरोप आहे. चार्ल्स शोभराज या पर्यटकांशी मैत्री करायचा आपल्या बोलण्याने त्यांना आकर्षित करायचा. त्यानंतर त्यांना ड्रग्ज द्यायाचा. एकदा पर्यटकावर नशेचा अंमल चढला की त्यांना लुटून त्यांची हत्या करायचा.

बिकिनी किलर चार्ल्स शोभराजशी लग्न करणारी २० वर्षांची नेपाळी तरूणी कोण ठाऊक आहे?

चार्ल्स शोभराजला बिकिनी किलर का म्हटलं जातं?
चार्ल्स शोभराजने ज्या हत्या केल्या त्यात काही महिलांचाही समावेश आहे. त्या महिला बिकिनीत असताना त्यांचे मृतदेह मिळाले आहेत. त्यामुळेच चार्ल्स शोभराजला बिकिनी किलर म्हणूनही ओळखलं जातं.

विश्लेषण: ‘बिकिनी किलर’ चार्ल्स शोभराजची सुटका का झाली? फ्रान्सचा नागरिक असलेल्या शोभराजचा भारताशी संबंध काय?

चार्ल्स शोभराजची मुक्तता करण्याचा निर्णय का घेण्यात आला?
चार्ल्स शोभराजची मुक्तता करण्याचा निर्णय नेपाळच्या सुप्रीम कोर्टाने घेतला. शोभराजने आपल्या सुटकेसाठी एक याचिका या कोर्टात दाखल केली होती. त्याने याचिकेत हा दावा केला होता की मला माझ्या गुन्ह्यांसाठी जी शिक्षा मिळायाची होती ती मिळाली आहे त्यामुळे मला सोडण्यात यावं. नेपाळच्या कायद्यानुसार जर कोणत्याही कैद्याने त्याला मिळालेल्या शिक्षेपैकी ७५ टक्के शिक्षा भोगली असेल आणि त्याची वागणूक चांगली असेल तर त्याला वृद्ध कैद्यांना मिळणाऱ्या सवलतीनुसार मुक्त करता येतं. याचनुसार नेपाळच्या सुप्रीम कोर्टाने शोभराजची सुटका करण्याचा निर्णय घेतला.

Story img Loader