अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यातील एक व्हिडिओ क्लिप फेसबुकवर व्हायरल होत आहे. या सोहळ्यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्य बिल क्लिंटन आणि राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत असलेल्या त्यांच्या पत्नी हिलरी क्लिंटन हे दाम्पत्य उपस्थित होते. यावेळी कोणाकडे तरी टक लावून पाहतानाचा बिल क्लिंटन यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. बरं त्यांना टक लावून पाहताना हिलरी यांनी पाहिले आणि ‘यांचे काय नेहमीचेच’ अशी प्रतिक्रिया हिलरींनी दिली. आता हा क्षण हुशार कॅमेरामनने आपल्या कॅमेरात कैद केला नाही तर नवलच!
Viral Video : अन् डोनाल्ड ट्रम्पही म्हणू लागले ‘मित्रों’
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यातील काही क्षण असो की ओबामांपासून ते क्लिंटनच्या चेह-यावरील हावभाव असो या सगळ्यांचे विनोदी फोटो गेल्या आठवड्याभरापासून चर्चेचा विषय बनला आहे. यात सगळ्यात कहर ठरला तो क्लिंटन दाम्पत्यांचा व्हिडिओ. शपथविधी सोहळ्यात ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया आणि मुलगी इवांका यांनीही हजेरी लावली होती. या दोघीही त्या दिवशी फारच सुंदर दिसत होत्या अशा चर्चाही सोशल मीडियावर रंगल्या. अशात त्यांच्या मोहक रुपाकडे कोणी पाहत बसले तर नवल वाटायला नको. मग बिल क्लिंटन तरी कसे सुटणार? बिल क्लिंटन यांनाही या सोहळ्यात कोणाकडेतरी टक लावून पाहताना हिलरी क्लिंटन यांनी पकडले. या क्लिंटन दाम्पत्यांची ही कौटुंबिक जिवनातील नोकझोक कॅमरापासूनही लपली नाही. पण क्लिटंन यांचे ( महिलांकडे ) पाहणे नेहमीचेच अशा अर्विभावात हिलरींनी त्यांच्याकडे पाहिले. यावेळी हिलरी यांनी दिलेल्या प्रतिक्रिया अशा काही मजेशीर होत्या की सोशल मीडियावर त्या व्हायरल होत आहे. नक्कीच बिल हे मेलानिया किंवा इवांककडे पाहत असतील अशा प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे हिलरी क्लिंटन या काही बिलला घरी गेल्यावर सोडणार नाही असे विनोद आता सोशल मीडियावर रंगत आहे.
अमेरिकन निवडणुकांच्या वेळी हिलरी आणि ट्रम्प यांच्यात चुरसीची स्पर्धा होती. तेव्हा हिलरी यांना खिजवण्यासाठी ट्रम्प यांनी त्यांच्या मर्मावर बोट ठेवले. बिल क्लिंटनची पूर्व प्रेयसी जेनिफर फ्लॉवर्स हिला आणून उभं करु अशी धमकी ट्रम्प यांनी दिली होती. बिल क्लिंटन यांचे अनेक महिलांशी संबंध होते असे आरोप त्यांच्यावर अनेकांनी केलेत त्यातूनच ‘द क्लिंटन्स वॉर ऑन वुमन’ या पुस्तकात याचवरून हिलरी यांनी बिल क्लिंटनना मारहाण केल्याचा दावाही करण्यात आला होता. त्यामुळे साहजिकच आता इवांका आणि मेलानियाकडे बघण्याचे परिणाम त्यांना भोगावे लागणार अशी खिल्ली सोशल मीडियावर उडवली जात असेल तर त्यात गैर वाटायला नको.