अंकिता देशकर
Bill Gates Arrest: लाईटहाऊस जर्नालिज्मला एक पोस्ट मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया वायरल होत असलेली लक्षात आली. या पोस्टमध्ये बिल गेट्स यांना अटक करण्यात आली असल्याचा दावा केलेला आहे. गेट्स यांना मानवतेविरुद्ध गुन्ह्यांसाठीची तक्रार दाखल झाली असून त्यांना अटक करण्यात आली आहे असे सांगणाऱ्या पोस्टमधील बातमीचा स्रोत द वॉशिंग्टन पोस्ट असा दिला आहे. फोटोमध्ये आपण पाहू शकता की गेट्स यांना पोलिसांनी खुर्चीला बांधून ठेवलेलं आहे. नेमकं हे प्रकरण काय आणि व्हायरल पोस्टमध्ये तथ्य आहे का याविषयी सविस्तर तपास आता समोर आला आहे.
काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर @GENIC0N ने व्हायरल पोस्ट शेअर केली.
इतर यूजर्स देखील हा व्हायरल दावा शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही गूगल कीवर्ड सर्च करून आमचा तपास सुरू केला. आम्हाला बिल गेट्स यांना अटक झाल्याचे सांगणारी एकही बातमी आढळली नाही. पोस्टमध्ये वॉशिंग्टन पोस्टचा उल्लेख असल्याने, आम्ही वॉशिंग्टन पोस्टची वेबसाइट देखील तपासली. आम्हाला गेट्स यांच्या अटकेची कोणतीही बातमी वेबसाइटवर आढळली नाही.
त्यानंतर आम्ही व्हायरल पोस्टवर गूगल रिव्हर्स इमेज सर्च केले. यामुळे आम्हाला अब्दुलमाजिद कामिल बदावी यांच्या चॅनेलवरील YouTube व्हिडिओकडे निर्देशित करण्यात आले. व्हिडिओचे शीर्षक होते, ‘डेथ पेनल्टी: द रिअल डील’.
या सुमारे ४ मिनिटांच्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती टेबलाला बांधलेली दिसत आहे. हाच फोटो बिल गेट्स यांच्या चेहऱ्याच्या इमेजने मॉर्फ केला गेला आहे. व्हायरल फोटो डिजिटली बदलला गेला आहे. तपासाच्या पुढील टप्प्यात आम्ही ईमेलद्वारे बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनशी संपर्क साधला. त्यांनी हा दावा खोटा असल्याचे उत्तर दिले. आम्ही ईमेलद्वारे वॉशिंग्टन पोस्टच्या जनसंपर्क व्यवस्थापक सवाना स्टीफन्स यांच्याशी देखील संपर्क साधला. त्यांनी सुद्धा , “द पोस्टने ही बातमी प्रकाशित केलेली नाही असे सांगितले.”
हे ही वाचा<< मुंबई लोकल ट्रेनमध्ये महत्त्वपूर्ण बदल! यापुढे ‘हा’ डबा ज्येष्ठ प्रवाशांसाठी असणार राखीव
निष्कर्ष: उद्योगपती आणि बिल गेट्स यांना अटक करण्यात आलेली नाही. व्हायरल दावा खोटा आहे, चित्र डिजिटली एडिट करण्यात आले आहे.