जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. असे बोलले जात आहे की ६७ वर्षीय बिल गेट्स पुन्हा प्रेमात पडले आहेत आणि सध्या ते सॉफ्टवेअर कंपनी ओरॅकलचे दिवंगत सीईओ मार्क हर्ड यांची पत्नी पॉला हर्डला डेट करत आहेत, पॉला ६० वर्षांची आहे. मार्क हर्ड यांचे २०१९ मध्ये निधन झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिल गेट्स आणि पॉल नात्यात?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिल गेट्स आणि पॉल गेल्या एक वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहेत, या दोघांचे नाते मीडियामध्ये चर्चेत आले जेव्हा ते दोघे ऑस्ट्रेलियन ओपन मेन्स सिंगल्स फायनलमध्ये एकत्र बसलेले दिसले. त्यावेळीची छायाचित्रे देखील समोर आली होती.
दोघांनी बरेच दिवस आपले नाते जगापासून लपवून ठेवले होते.

तब्बल ३० वर्षांनी बिल गेट्स यांनी लग्न मोडले होते..

बिल गेट्स यांनी २०२१ मध्ये मेलिंडा गेट्सला घटस्फोट दिला होता. हे लग्न तीस वर्षांनंतर तुटले, त्यामुळे या दोघांचा घटस्फोट जगभरात चर्चेत आला होता. या दोघांनी ऑगस्ट २०२१ मध्ये घटस्फोटाची घोषणा केली होती. या दोघांना तीन मुले आहेत.

बिल गेट्स यांची गर्लफ्रेंड कोण?

पॉला या ओरॅकलचे माजी अध्यक्ष मार्क हर्ड यांच्या पत्नी आहेत. २०१९ मध्ये मार्क हर्ड यांचे निधन झाले होते. पॉला यांना दोन मुली आहेत.

( हे ही वाचा: नदी ओलांडणाऱ्या हरणाचा मगरीकडून पाठलाग; पाहा घटनेचा थरारक Video)

परस्पर संमतीने घटस्फोट

मेलिंडा फ्रेंचने जारी केलेल्या नोटमध्ये तिने लिहिले आहे की ती आणि बिल परस्पर संमतीने घटस्फोट घेत आहेत परंतु ते सर्व प्रकल्पांमध्ये एकमेकांसोबत व्यावसायिकपणे काम करत राहतील.

बिल गेट्सच्या अफेअरमुळे मेलिंडा नाराज होत्या

दोघांनी घटस्फोटाचे कारण सांगितले नाही, परंतु न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या बातमीत लिहिले आहे की, ‘बिल आणि मेलिंडा यांच्यात २०१८ पासून तणाव सुरू होता आणि मेलिंडा तिचा पती बिल गेट्सच्या अफेअर्सबद्दल खूप दिवसांपासून नाराज होती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bill gates falling in love again dating paula hurd report gps