मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक व प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स काही दिवसांपूर्वी भारतात आले होते. तर काल बिल गेट्स यांनी ‘भारत दौऱ्याचा’ व्हिडीओ त्यांच्या अधिकृत @billgates यूट्युब चॅनेलवर पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये त्यांनी भारतातील कोणत्या प्रसिद्ध ठिकाणांना भेट दिली याचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. तसेच ही ठिकाणे इतकी प्रेरणादायक का आहेत यावर बिल गेट्स यांनी त्यांचे विचारसुद्धा व्यक्त केले आहेत.
केवडियातील स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल यांचा ५९७ फूट उंचीचा जगातील सर्वांत उंच पुतळा दाखवीत या यूट्युब व्हिडीओची सुरुवात होते. त्यानंतर नंतर पुढे एक महिला स्टॅच्यू ऑफ युनिटी संग्रहालयाभोवती बिल गेट्स यांना मार्गदर्शन करताना दिसते. नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरची खास भेट; तर नागपूरच्या डॉली चहाविक्रेत्याचा चहा बनविताना बीटीएस (BTS) व्हिडीओची झलक आहे. तर काही सरकारी नेत्यांपासून ते उद्योजक, शास्त्रज्ञ, परोपकारी (philanthropists)पर्यंत अनेक भारतीयांची भेट त्यांनी या व्हिडीओत दाखवली आहे. एकदा पाहाच बिल गेट्स यांचा भारत दौरा.
हेही वाचा…लेक चालली सासरला… कुटुंबाने नवरीचं केलं ‘असं’ खास स्वागत; VIDEO पाहून व्हाल भावूक
व्हिडीओ नक्की बघा :
रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन आणि एमडी मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत आणि सून राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग कार्यक्रमात सुद्धा बिल गेट्स यांनी हजेरी लावली होती.
“बिल गेट्स यांचा भारतात राहण्याचा अनुभव चांगला ठरला. भारतात प्रवासादरम्यान त्यांनी साध्या कपातील चहापासून ते अविश्वसनीय अभियांत्रिकी प्रकल्प पाहिले. सरकारी नेते, उद्योजक, परोपकारी, शास्त्रज्ञ यांना ते भेटले. आरोग्य आणि विकासातील प्रगतीचा शोध घेतला, असा फोटो आणि व्हिडीओसंबंधीचा मजकूर देण्यात आला आहे. तसेच बिल गेट्स पुन्हा भारतात येण्यासाठी इच्छुक आहेत,” अशी कॅप्शन बिल गेट्स यांनी या भारत दौऱ्याच्या व्हिडीओला दिली आहे.