Viral Bill Gates Resume: मायक्रोसॉफ्टचे सीईओ बिल गेट्स हे जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. बिल गेट्स यांची संपत्ती, लाईफस्टाईल आणि त्यांच्या यशस्वी करिअरबद्दल जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो. बिल गेट्स यांनी त्यांचा ४८ वर्षांपूर्वीचा बायोडाटा सोशल मीडियावर शेअर केला आहे. मायक्रोसॉफ्टचे ६० वर्षीय मालक आणि $१२४.१ अब्ज इतकी संपत्ती असलेले बिल गेट्स यांनी ४८ वर्षापूर्वी नोकरी मिळवण्यासाठी त्यांच्या बायोडेटामध्ये नक्की काय काय लिहिलं होतं, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेलच. हा बायोडेटा शेअर करत त्यांनी नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक खास संदेश देखील दिला आहे.
मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष बिल गेट्स यांनी त्यांचा ४८ वर्षांचा बायोडेटा लिंक्डइन या सोशल नेटवर्किंग साइटवर शेअर केला आहे. बायोडेटा शेअर करताना बिल गेट्स यांनी लिहिले की “तुम्ही नुकतेच पदवीधर असाल किंवा कॉलेजमधून बाहेर पडलेले असाल, मला खात्री आहे की तुमचा बायोडेटा ४८ वर्षांपूर्वीच्या तुलनेत खूपच चांगला दिसत असेल.”
आणखी वाचा : VIRAL VIDEO : भरधाव वेगात कार जात होती अन् रुग्णवाहिकेच्या समोरून घसरली, डिव्हायडरला धडकली
बिल गेट्स यांनी शेअर केलेला त्यांच्या या बायोडेटामध्ये तुम्ही पाहू शकता की, सिस्टीम स्ट्रक्चर, डेटाबेस मॅनेजमेंट, कॉम्प्युटर ग्राफिक्स असे अनेक कोर्सेस त्यांनी केले आहेत. बिल गेट्स यांनी FORTRAN, COBOL, ALGOL, BASIC आणि इतर अनेक प्रोग्रामिंग भाषांमध्ये त्यांची प्रवीणता नमूद केली आहे. त्यांच्या बायोडेटामध्ये त्यांच्या पूर्वीच्या अनुभवांचाही उल्लेख केला आहे, ज्यावरून असे दिसून येते की त्यांनी १९७३ मध्ये “TRW सिस्टम्स ग्रुप्स” मध्ये सिस्टम प्रोग्रामर म्हणून काम केले होते. बिल गेट्स तेव्हा हार्वर्ड विद्यापीठात प्रथम वर्षाचे विद्यार्थी होते. १९७४ च्या बायोडेटामध्ये त्यांचे नाव विल्यम एच. गेट्स असे लिहिले आहे.
इथे पाहा हा बायोडेटा:
आणखी वाचा : नादच खुळा! अशी डॅशिंग सुपरबाईक तुम्ही यापूर्वी कधी पाहिली नसेल, हा VIRAL VIDEO एकदा पाहाच
लिंक्डइनवर बिल गेट्सचा बायोडाटा पोस्ट केल्यानंतर हजारो नेटकऱ्यांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ४८ वर्षांपूर्वी बिल गेट्स यांचा हा बायोडेटा पाहून नेटकऱ्यांचे डोके चक्रावून गेले आहे. बिल गेट्स यांचा ४८ वर्षे जुना बायोडेटा आजच्या तुलनेत खूपच प्रभावी वाटत असल्याचं नेटकरी सांगत आहेत. बायोडेटा शेअर केल्याबद्दल नेटकऱ्यांनी बिल गेट्सचे आभार मानले आहे. लोक म्हणतात की आपला जुना बायोडाटा ठेवला पाहिजे, जेणेकरुन तो भविष्यात पुढे जाईल तेव्हा त्याला त्याने भूतकाळात काय केले ते आठवेल.
आणखी वाचा : माकडाच्या पिल्लाची शिकार करण्यासाठी बिबट्याने झाडावरून उडी मारली, VIRAL VIDEO पाहून चक्रावून जाल
मायक्रोसॉफ्ट कंपनीची सुरुवात १९७५ मध्ये बिल गेट्स आणि पॉल अॅलन यांनी केली होती. आज जगातील टॉप ६ श्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स यांचा समावेश आहे. बऱ्याच काळापासून ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत आहेत. त्यांची एकूण संपत्ती सुमारे $१२४.९ अब्ज आहे. बिल गेट्स यांनी २००० मध्ये कंपनीच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला. गरजू लोकांसाठी काम करण्यावर भर देण्यासाठी त्यांनी बिल अॅण्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशन सुरू केले. २००८ मध्ये गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टमधील नोकरी सोडली. परंतु ते मंडळाचे सदस्य म्हणून मार्च २०२० पर्यंत राहीले होते.
आणखी वाचा : ‘सुपरफास्ट’ तिकीट बुक करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याचा VIDEO VIRAL
बिल गेट्सने सोशल मीडियावर शेअर केलेल्या रेझ्युमेवर अनेकांनी कमेंट्स केल्या आणि बिल गेट्सचा बायोडाटा शेअर केल्याबद्दल आभार मानले. लोक म्हणतात की एखाद्या व्यक्तीने आपला जुना बायोडाटा ठेवला पाहिजे जेणेकरुन तो भविष्यात पुढे जाईल तेव्हा त्याला त्याने काय केले ते आठवेल.
साठी अर्ज करताना त्याचा वापर केला. 60 वर्षीय मायक्रोसॉफ्टचे मालक आणि $124.1 बिलियन नेट वर्थ असलेले रेझ्युमे शेअर करताना बिल गेट्स यांनी लिहिले की, तुम्ही नुकतेच पदवीधर असाल किंवा कॉलेजमधून बाहेर पडलेला असाल, तुमचा रेझ्युमे माझ्या 48 वर्षांच्या रिझ्युमेपेक्षा चांगला असेल.