युके स्थित एक कुटुंब त्यांच्या कुत्र्यासाठी कायमस्वरूपी पूर्ण वेळ केअरटेकर शोधत आहे. या खास कामासाठी तो त्या व्यक्तीला वर्षाला एक कोटी देण्यास तयार आहे. या नोकरीची पात्रता आणि त्या व्यक्तीचा अनुभव पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. कुटुंबाच्या दोन कुत्र्यांची काळजी घेण्यासाठी, केअरटेकरला सेंट्रल लंडनच्या नाइट्सब्रिजमध्ये कुटुंबासह राहावे लागेल. व्यक्तीला कुत्र्यांच्या खेळण्याची वेळ, त्यांच्या डॉक्टरांच्या भेटी आणि त्यांच्या एकूण आरोग्य या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – चालत्या बसमध्ये डुलकी घेणं पडलं महागात, तोल गेला अन् दरवाज्यातून थेट….Video पाहून अंगावर येईल काटा!

आतापर्यंत ४०० हून अधिक लोकांनी अर्ज केले आहेत

ही विशिष्ट नोकरीची जाहिरात फेअरफॅक्स आणि केन्सिंग्टन नावाच्या कंपनीने पोस्ट केली आहे. खासगी कंपनीने सांगितले की, ”ते पहिल्यांदाच कुत्र्यासाठी केअर टेकर नोकरीसाठी जाहिरात देत आहेत. त्याने ही नोकरी शेअर केल्यापासून ४०० हून अधिक लोकांनी त्यासाठी अर्ज केले आहेत. भरती करणार्‍या जॉर्ज डनच्या म्हणण्यानुसार, ”पशुवैद्यकालाही इतका पगार मिळत नाही. क्लायटं ग्राहक अब्जाधीश आहेत आणि त्यांच्या कुत्र्यांसाठी इतके पैसे द्यायला तयार आहेत.”

हेही वाचा – दिलदार चोरटे! बंदुकीचा धाक दाखवून जोडप्याला लुटायला आले, १०० रुपये हातात ठेवून गेले; घटना सीसीटिव्हीमध्ये कैद

या सुविधा मिळून मिळतील

कामाचे तास निश्चित नसून व्यक्तीचे वेळापत्रक कुटुंबानुसार सांभाळावे लागेल, असे नोकरीत स्पष्टपणे नमूद केले आहे. भरती करणार्‍याने सांगितले की, या कामात ६ आठवड्यांची रजा देखील दिली जात आहे, परंतु जेव्हा तुमचे क्लायंट असे असतात, तेव्हा दुसर्‍या दिवशी तुम्हाला खाजगी जेटने कुत्र्यांसह मोनॅकोला जावे लागू शकते. तुम्हाला त्यांच्यासोबत सतत राहावे लागेल. आपले वैयक्तिक जीवन पूर्णपणे संपवून. भरती करणाऱ्या कंपनीने कुत्र्यांशी संबंधित इतर कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Billionaire family looks for live in dog nanny puts up viral offer for rs 1 crore salary per year snk
Show comments