अंकिता देशकर
Biparjoy Cyclone Viral Video: बिपरजॉय चक्रीवादळ अरबी समुद्रातून पाकिस्तानच्या दिशेने जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या मात्र दोन दिवसांपूर्वी या चक्रीवादळानं दिशा बदलून गुजरतच्या दिशेनं आपला मोर्चा वळवल्यानं किनारी भागातील सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. गुरुवारी अर्थात १५ जून रोजी संध्याकाळी चारच्या सुमारास हे चक्रीवादळ गुजरातच्या कच्छ भागातील जखाऊ बंदराला धडकणार आहे. सोशल मीडियावर सुद्धा या चक्रीवादळासंबंधित अनेक फोटो व व्हिडीओ सातत्याने व्हायरल होत आहेत. लाईटहाऊस जर्नालिज्मने या व्हिडीओचे परीक्षण करून यामागील खरी परिस्थिती काय याचा आढावा घेतला आहे.
काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर BK Prasant ने व्हायरल व्हिडिओ शेअर केला, ज्यात एका भल्यामोठ्या लाटेमुळे बोट आपले संतुलन गमावत असल्याचे पाहायला मिळतेय.
बाकी यूजर्स देखील हाच व्हिडिओ शेअर करताना दिसले.
आम्हाला इंटरनेटवर आणखी एक व्हिडिओ देखील सापडला जो चक्रीवादळ बिपरजॉयचा असल्याचा दावा केला गेला होता.
या व्हिडिओमध्ये वाळूचे वादळ पाहायला मिळते.
बाकी यूजर्स देखील हा दावा शेअर करत आहेत.
तपास:
व्हिडिओ १:
आम्ही इन्व्हिड टूल मध्ये हा व्हिडिओ अपलोड केला आणि त्याचे किफ्रेम्स मिळवले. या किफ्रेम्सला आम्ही गूगल रिव्हर्स इमेज सर्च द्वारे शोधले.
आम्हाला पहिलाच स्क्रीन ग्रॅब, एका आर्टिकल मध्ये newscinema.in वर सापडला. या न्यूज आर्टिकल चे शीर्षक होते: वॉशिंग्टनमधील कोस्ट गार्डने ३५ वर्षीय इसमाला बोट उलटल्याच्या दुर्घटनेत वाचवले
हे आर्टिकल ४ फेब्रुवारी २०२३ रोजी अपलोड करण्यात आले होते. आम्हाला हे स्क्रीन ग्रॅब्स NDTV मधील एका न्यूज आर्टिकल मध्ये देखील सापडले. हे आर्टिकल ६ फेब्रुवारी २०२३ रोजी अपलोड करण्यात आले होते.
लेखात नमूद करण्यात आले आहे की, एका महाकाय लाटेने बोट उलटल्यावर कोस्टगार्ड जहाजावरील एका माणसाला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. आम्हाला हा व्हिडिओ BBC News (World) ने केलेल्या एका ट्विट मध्ये देखील सापडला.
आम्हाला या संबंधी काही व्हिडिओ USCGPaciicNorthwest वर देखील सापडले.
या ट्विट मध्ये सविस्तर त्या घटनेची माहिती दिली होती.
व्हिडिओ २:
आम्ही हीच प्रक्रिया दुसऱ्या व्हिडिओ साठी केली. आम्ही व्हायरल व्हिडिओ अपलोड केला आणि इन्व्हिड टूलद्वारे कीफ्रेम मिळवल्या आणि इंटरनेटवर या कीफ्रेम शोधल्या.
आम्हाला हा व्हिडिओ एका CNN मध्ये अपलोड केलेल्या आर्टिकल मध्ये सापडला. आर्टिकल चे शीर्षक होते: See massive sandstorm engulf Egypt’s Suez Canal
त्यात हे देखील नमूद केले होते: असामान्यपणे जोरदार वाळूच्या वादळामुळे संपूर्ण इजिप्तमध्ये किमान एक व्यक्ती ठार आणि अनेक जण जखमी झाले.
आम्हाला हे आर्टिकल आणि व्हिडिओ BBC च्या वेबसाईट वर देखील सापडले.
इजिप्तच्या काही भागांना धूळ आणि वाळूच्या वादळाचा फटका बसल्याचे लेखात नमूद करण्यात आले आहे. या आर्टिकल मध्ये म्हटले होते.
निष्कर्ष: बिपरजॉय चक्रीवादळ असल्याचा दावा करणारे असंबंधित आणि जुने व्हिडिओ अलीकडचे असल्याचे शेअर करण्यात येत आहेत. व्हायरल दावे खोटे आहेत.