बदकं पाण्यात पोहोतात त्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण आपोआप वाढते असे मत काल त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी व्यक्त केले. त्रिपुरातील रुद्रसागर येथे एका पारंपारिक बोट रेसच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी देव यांनी व्यक्त केलेल्या या मतावरून सोशल मिडीयावर त्यांची खिल्ली उडवण्यात आली. मात्र आता देव यांच्या मजेशीर वाटणारा हा दावा योग्य असल्याचे मत एका तज्ञाने व्यक्त केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इंडियन कौन्सिल ऑफ फॉरेस्ट्री रिसर्च अँड एज्युकेशन या संस्थेमध्ये वैज्ञानिक असणाऱ्या देबबर्मा यांनी देव यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. बदकं नैसर्गिकरित्या हवा शुद्ध करतात आणि त्यांच्या विष्ठेमुळे माश्यांची वाढ होण्यास मदत होते असे मत देबबर्मा यांनी नोंदवले आहे. अनेक ठिकाणी बदकं आणि माश्यांचे एकत्रच उत्पादन घेतले जाते. बदकांची विष्ठा माश्यांच्या वाढीसाठी चांगली असते. बदकं नैसर्गिक पद्धतीने हवा शुद्ध करुन हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात. वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या अभ्यास आणि संशोधनातून हे सिद्ध झाल्याचा दावा देबबर्मा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केला आहे.

ग्रामीण भागातील जनतेने बदकं पाळण्याला प्राधान्य द्यायला हवे, बदकं ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळे बदकांच्या पुरवठा करण्याचा आपला मानस असल्याचे मुख्यमंत्री देव यांनी काल म्हटले होते. रुद्रसागर येथे नीर महाल नामक एका मोठ्या वाड्याभोवती कृत्रित तलाव निर्माण करण्यात आला आहे. या तलावाच्या भोवती राहणाऱ्या मासेमाऱ्यांना ५० हजार बदकांची पिल्ले देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर संपूर्ण त्रिपुरामधील ग्रामीण भागात पांढऱ्या रंगाची बदकांचे वाटप करण्यात येणार आहे. प्रामुख्याने पर्यटनस्थळांच्या ठिकाणी ही बदकं वितरीत केली जातील त्यामुळे अशा तलावांचे नैसर्गिक सौंदर्य टिकून राहील तसेच त्याचा ग्रामीण अर्थव्यवस्थेला फायदाही होईल, असे देव यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना देव म्हणाले, जेव्हा बदकं पाण्यामध्ये पोहतात तेव्हा ऑक्सिजनची पातळी आपोआप वाढते. त्यामुळे पाण्यातील माशांना जास्त ऑक्सिजन मिळतो. त्याचबरोबर पक्षांची विष्ठाही ते खात असल्याने पाणी स्वच्छ राहते. त्याचा उपयोग माशांच्या वेगाने वाढीला होतो. हे पूर्णतः नैसर्गिक पद्धतीने होते.

देव यांच्या या वक्तव्यावर टिका होत असतानाचा विशेष नेमणूक करण्यात आलेले देव यांच्या सरकारमधील अधिकारी संजय मिश्रा यांनी या संदर्भात छत्तीसगडमधील इंदिरा गांधी कृषी विद्यापिठामध्ये संशोधन करण्यात आल्याचा दावा केला. या संशोधनामध्ये बदकं ज्या पाण्यात पोहतात त्या पाण्यामध्ये हवेतील फॉस्फेट मिसळला जातो आणि अन्य काही उपयुक्त घटकांची निर्मिती होते. या घटकांमुळे पाण्यामधील शेवाळ वाढीस चालना मिळते. याच शेवाळामुळे पाण्यामध्ये ऑक्सिजनची निर्मिती होते असे संशोधनात नमूद करण्यात आल्याचे मिश्रा यांनी सांगितले. पुरातन काळापासूनच बदकांचा वापर मानवाकडून केला जात आहे. आणि यासंदर्भातील वैज्ञानिक पुरावेही उपलब्ध आहेत असे मत मिश्रा यांनी एएनआयशी बोलताना नोंदवले. तसेच देव यांची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने या वक्तव्यासंदर्भात चर्चा केली जात असल्याचा आरोपही मिश्रा यांनी केला आहे.