सोशल मीडियावर जंगली प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्याचं तुम्ही पाहिलं असेल. प्राण्यांचे हे व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात बघितले जातात आणि याला नेटकऱ्यांची विशेष पसंतीही मिळते. यूजर्सही हे व्हिडिओ मनोरंजनाचं एक उत्तम साधन असतं. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हालाही मजा येईल.

‘चिऊ आणि काऊ हे दोन पक्षी अगदी लहानपणापासूनच आपल्याला फ्रेण्डली असतात, त्यांची भीती वाटत नाही. चिऊचं नाही पण काऊ हा पक्षी त्याला कुणी इजा पोहचविल्यास तो ते लक्षात ठेवतो आणि बदला घेतो, असं तुम्ही ऐकलं असेलंच. मात्र, काऊचाच सध्या एक अजब व्हिडीओ समोर आला आहे. यात दिसतं, की कावळा हा कोणत्या प्राणी किंवा माणसावर नाही तर एका ड्रोनवर हल्ला करतोय. एका निर्जीव ड्रोनवर कावळा का हल्ला करतोय, असं काय झालं आणि पुढे नेमकं काय घडतं हे तुम्ही व्हिडीओमध्ये पाहा.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आकाशात एक ड्रोन फिरतंय. आकाशात आपल्यासारखं आणखी नवीन कोण तरी उडतंय हे पाहून कावळ त्या ड्रोनजवळ येतो आणि त्याच्यावर हल्ला करण्यास सुरूवात करतो. आपल्या चोचीने त्या ड्रोनवर हल्ला करत ड्रोनला पाडण्याचा त्याचा प्रयत्न सुरू असतो. कावळा हल्ला करतो, ही नक्कीच आश्चर्याची बाब आहे. पण ड्रोनचा आवाज ऐकून हा कावळा घाबरतो. बऱ्याच प्रयत्नानंतर हा कावळा हार मानतो आणि तिथून निघून जातो. त्यानंतर ड्रोनमधून खाली एक बॅग सोडताना दिसून येतेय. पुन्हा एकदा हा कावळा तिथून एक फेरी मारतो. पण बाजूनेच उडत तो तिथून पळ काढतो.

सोशल मीडियावर या व्हिडीओला लोकांची भरपूर पसंती मिळत आहे. हा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. काही दिवसांपूर्वीच एका मगरीने ड्रोनची शिकार करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर ड्रोनवर हल्ला करणाऱ्या कावळ्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

हा व्हिडीओ ऑस्ट्रेलियातला असल्याचं सांगण्यात येतंय. ऑस्ट्रेलियातील एका ग्राहकाने एअर डिलिव्हरीद्वारे जेवणाची ऑर्डर मागवली होती. त्याच्या घरी ही ऑर्डर ड्रोनद्वारे डिलीव्हर झाली होती. हा ग्राहक त्याच्या घरी फुड डिलिव्हरी घेऊन येणाऱ्या ड्रोनची वाट पाहत खिडकीत बसला होता. घराजवळ फुड डिलीव्हरी घेऊन येणारा ड्रोन येताच त्यावर कावळ्याने हल्ला केल्याचं त्याने पाहिलं. हा मजेशीर क्षण त्याने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय. काही युजर्सनी तर या व्हिडीओला ‘CROW VS DROWN’ अशी कॅप्शन दिलीय. तर काही युजर्सनी अशी सेवा सुरू करण्यापूर्वीच अशा घटनांचा विचार केला पाहिजे असंही म्हटलंय.

गुगलने ऑस्ट्रेलियाच्या कॅनबेरामध्ये अशी एअर डिलीव्हरी सेवा सुरू केलीय. यात ड्रोनद्वारे कॉफी, अन्न, औषध आणि हार्डवेअर वस्तू घरपोच दिल्या जातात. Storyful Rights Management नावाच्या युट्यूब चॅनवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. काही दिवसांपूर्वीच हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून आतापर्यंत हा या व्हिडीओला ३२,१२० इतके व्ह्यूज मिळाले आहेत.