आयुष्य जगताना जोडीदाराची भूमिका ही खूप मोठी असते. जोडीदाराशिवाय जगणं कठीण होत मग ते माणसाचं असो वा प्राण्याचं. जिव्हाळ्याची माणसं असली तरी जोडीदाराची जागा कोणी घेऊ शकत नाही. ते एक हक्काचं माणूस वयाच्या प्रत्येक वळणावर सोबत हवंस वाटतंच. नियती मात्र कधीतरी जोडीदाराशिवाय जगण्याची शिक्षा देते. असाच एक भावनिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका पक्ष्याचा मृत्यू झाला, त्याच्या जोडीदाराला हा धक्का सहन झाला नाही. काही सेकंदात त्याने त्याच्या मृतदेहावरच आपला जीव सोडला.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन पक्षी आहेत. मात्र त्यातील एका पक्षाचा मृत्यू झाला आहे. आपल्या जोडीदाराचा मृत्यू झालाय हे दुसऱ्या पक्षाला सहनच होत नाहीये त्यामुळे तो त्याच्याजवळ त्याला उठवण्याचा प्रयत्न करत आहे. जवळच्या माणसाच्या जाण्याचं दुःख अंगावर आलं की काहीच कळत नाही अशी अवस्था या पक्षाची झाली आहे. जिवलगाच्या जाण्यानं निर्माण झालेल्या पोकळीसह आता जगायचं कदाचीत असाच विचार हा पक्षी करत असावा. दरम्यान जोडीदाराच्या मृत्यूचा धक्का त्याला सहन झाला नाही. त्याने त्याच्या मृतदेहावर आपलं डोकं ठेवलं आणि तिथंच उभ्या उभ्या जीव सोडला.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Video: चक्क माकडानं प्यायली दारू; मग नशेत असं काही केलं की नेटकऱ्यांनी ‘आदिपुरुष’शी केली तुलना
हा अतिशय भावनिक व्हिडीओ पाहून नेटकरीही भारावून गेले आहेत. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकरी अनेक प्रतिक्रिया यावर देत आहेत.