सोशल मीडियावर व्हायरल झालेले अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. काही व्हिडीओ आनंद देतात, काही हसवतात तर, काही भावूक करतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक छोटा पक्षी आपल्या अंड्यांसाठी एका महाकाय जेसीबी मशीनशी कसा भांडतो ते दिसून येत. स्वतःच्या जिवाची पर्वा न करता एक आई संकटात अडकलेल्या तिच्या बाळाचे रक्षण करण्यासाठी सर्व अडचणींशी लढते.

नक्की काय झालं?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक पक्षी माती असलेल्या जागेवर अंडी घालत आहे. त्याचवेळी एक जेसीबी मशीन त्या ठिकाणी पोहोचते. जेसीबी मशिन आपल्या अंड्यांकडे येत असल्याची माहिती पक्ष्याला मिळताच त्याची कोणतीही पर्वा न करता जेसीबीशी पक्षी लढायला सुरुवात करतो. पक्षी पाहतो की जेसीबी त्याच्या अंड्यांजवळ येत आहे तेव्हा तो, पंख फडफडवू लागतो आणि जोरात आजव करू लागतो. जेसीबी बाजूला होऊ पर्यंत पक्षी हार मनात नाही.

(हे ही वाचा: Puzzle: ‘या’ फोटोतील हत्तीला किती पाय आहेत? तुम्ही सांगू शकता का योग्य उत्तर?)

(हे ही वाचा: वाघिणीने रानडुकरावर केला हल्ला, सुटण्यासाठी तो ओरडत राहिला आणि…; बघा Viral Video)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. १ मिनिट १९ सेकंदांचा हा व्हिडीओ आतापर्यंत १ लाख २० हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओ पाहून लाखो लोक भावूक झाले. लोक पक्ष्याच्या, या मातेच्या शौर्याचे कौतुक करत आहेत.

Story img Loader