Viral Video : पत्रकार एखाद्या घटनेची माहिती देण्यासाठी त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन लाईव्ह रिपोर्टिंग करत असतात. तसेच यादरम्यान त्यांना अनेक समस्यांनासुद्धा सामोरे जावे लागते. तर आज पत्रकाराबरोबर एक मजेशीर घटना घडली आहे; त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एक पत्रकार लाईव्ह रिपोर्टिंग करत असतो, तेव्हा एक पक्षी येऊन त्याच्या कानातले ब्ल्यूटूथ इअर बड्स ( Bluetooth earbuds) काढतो आणि उडून जातो; जे बघून तुम्हाला हसू आवरणार नाही.
व्हायरल व्हिडीओ परदेशातील पत्रकाराचा (Reporter) आहे. पत्रकार लाईव्ह रिपोर्टिंग करत असतो. तितक्यात अचानक त्याच्या खांद्यावर पक्षी येऊन बसतो. पण, पत्रकार त्याचे काम सुरूच ठेवतो. त्यानंतर पक्षी एक मजेशीर गोष्ट करतो. पत्रकार रिपोर्टिंग करत असतो, तर काही वेळ पक्षी तरुणाच्या खांद्यावर गप्प बसून राहतो आणि अचानक पत्रकाराने कानात लावलेलं एक ब्ल्यूटूथ इअर बड्स आपल्या चोचीने काढतो आणि उडून जातो. पक्षाने कशाप्रकारचे पत्रकाराचे इअर बड्स काढून घेतले एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…
हेही वाचा… पाणी पुरी खायला आवडते? हा व्हायरल व्हिडीओ पाहून पाणी पुरी खाण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल
व्हिडीओ नक्की बघा :
पक्षी गेला ब्लूटूथ इअर बड्स घेऊन :
पत्रकारांना घटनेचं कव्हरेज करण्यासाठी ठिकठिकाणी वेळीच हजर राहावे लागते. पत्रकारांसोबत लाईव्ह रिपोर्टिंग करताना बऱ्याच अडचणीसुद्धा येतात. तरीसुद्धा पत्रकार नेहमीच आपले काम प्रामाणिकपणे करताना दिसतात. तर आज व्हायरल व्हिडीओतसुद्धा असंच पहायला मिळालं आहे. पत्रकार एखाद्या घटनेची लाईव्ह माहिती सांगत असतो, तितक्यात पक्षी येतो आणि पत्रकाराच्या कानात लावलेला एक ब्ल्यूटूथ इअर बड्स आपल्या चोचीने काढून उडून जातो आणि यादरम्यान पत्रकाराचे हावभाव अगदीच बघण्यासारखे असतात.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @buitengebieden या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून अनेक जण ‘पक्षालासुद्धा ॲपल प्रोडक्टसचा मोह आवरला नाही बहुतेक’, ‘हे बघून, पक्षांना मोफत ब्ल्यूटूथ इअर बड्स घेऊन येण्यासाठी प्रशिक्षण द्यायला पाहिजे’ अशा मजेशीर कमेंट व्हिडीओखाली काही जण करताना दिसून येत आहेत.