Viral Video: केस हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. सकाळी घराबाहेर पडताना केस काही मिनीटांत व्यवस्थित बांधले गेले, दिवसभरातील आपले फोटो या केसामुळे चांगले आले की, लगेच आपण त्याला गुड हेअर डे (Good Hair Day) म्हणतो. कारण – केसांमुळेच आपले सौंदर्य असते. सध्या कुरळे केस म्हणजे स्टाइल स्टेटमेंट मानलं जातं. तर आज सोशल मीडियावर याचसंबंधित काहीतरी खास पाहायला मिळालं आहे. माणसाचे कुरळे केस पक्ष्याच्या घरट्यात बदललं आहे. कसं ते या लेखातून जाणून घेऊ.
अनेकदा कुरळ्या केस असणाऱ्या व्यक्तींना “बाल हैं या चिडिया का घोसाला?” असे हिंदीमध्ये मुद्दाम म्हंटले जाते. पण, आजच्या या व्हिडीओत याचे एक उदाहरण पाहायला मिळालं आहे. व्हायरल व्हिडीओ श्रीलंकेचा आहे. पक्षी आपले घरटे समजून तरुणाच्या कुरळ्या केसांवर जाऊन बसला आहे. हे पाहताच तेथे उपस्थित तरुणांच्या मित्रांनी हा मजेशीर प्रसंग रेकॉर्ड करण्याचे ठरवले. पक्षी डोक्यावर येऊन बसताच तरुणीचे हावभाव काय होते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा.
हेही वाचा…दोन भावंडांचा रंगला अनोखा खेळ; एक उभा राहिला स्केटबोर्डवर, तर दुसरा… नैसर्गिक खेळाचा ‘हा’ VIDEO पाहा
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, कुरळे केस असणाऱ्या तरुणाच्या डोक्यावर पक्षी येऊन बसताच त्याला सुद्धा हसू आवरत नाही आहे. तरुणाचे केस पाहून पक्षी देखील गोंधळून गेला आणि कुरळे केस त्याचे घरटे आहे असे समजू लागला. या मजेशीर प्रसंगाचा आनंद तरुण देखील घेताना दिसत आहे. पक्ष्याला माणसाच्या कुरळ्या केसांमध्ये थोडी उब सापडली आहे असे म्हणायला हरकत नाही. तसेच हे दृश्य पाहता तरुणाच्या मित्रांनी आपापल्या मोबाईलमध्ये या दृश्याचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @maviarayhan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून “बाल हैं या चिडिया का घोसाला?” यावर नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, ‘आज दादाने माझ्या आईचे शब्द सिद्ध करून दाखवले’. तर दुसऱ्याने ‘आज आपल्याकडे पुरावा आहे’. तर तिसऱ्याने ‘पक्षी सुद्धा गोंधळून गेला’ ; आदी विविध मजेशीर कमेंट व्हिडीओखाली केलेल्या दिसून येत आहे. एकूणच या व्हिडीओने सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.