तुम्ही अनेकदा मधमाश्यांचे पोळे आजूबाजूच्या परिसरात नक्की पाहिले असेल. मात्र त्यामधून मध काढायची हिंमत तुम्ही कधी केलीय का? कदाचित नाही, कारण पोळ्याच्या रक्षणासाठी मधमाश्या त्यावर बसून असतात. त्यांच्या उपस्थित तुम्ही मध काढायला गेलात तर ते तुमचा चावा घेतल्याशिवाय सोडणार नाहीत. पण सध्या सोशल मिडीयावर एक पक्षी मधमाश्यांच्या पोळ्यातून मध चोरत असल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. एका पक्षाला अशाप्रकरे मध काढताना तुम्ही क्वचितच पाहिलं असेल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरं तर एका यूजरने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा पक्षी घराजवळील खिडकीवर असलेल्या मधमाशीच्या पोळ्याजवळ बसल्याचे व्हिडिओत दिसत आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे या काळात सर्व मधमाशा आजूबाजूला उडताना दिसत आहेत, पण हा पक्षी बिनधास्तपणे त्या पोळ्यातील मध काढून चोचीत घेत आहे.

( हे ही वाचा: Video: भयंकर! चालत्या बसमध्ये चालकाला आला हार्ट अटॅक; नियंत्रण सुटल्याने बस प्रत्येकाला उडवत सुटली अन…)

( हे ही वाचा: कोकणातल्या रस्त्यावर नक्की चाललंय तरी काय? ड्रायव्हर नसतानाही गोल गोल का फिरतेय ‘ही’ रिक्षा? पाहा Video)

हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर होताच तो प्रचंड व्हायरल झाला आहे. तसंच अनेकांनी यावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, हा पक्षी खूप चांगला चोर आहे, तर काही लोक या पक्ष्याला ओळखण्याचा प्रयत्न करत आहेत.