सोशल मीडियावर अनेक मजेदार फोटोज आणि व्हिडीओज व्हायरल होत असतात. यामध्ये विविध जंगली प्राण्यांचे तर कधी पाळीव प्राण्यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या अशाच प्रकारचा एका पक्षाचा व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एका बाकावर विश्रांती घेण्यासाठी बसलेल्या वृद्ध व्यक्तीच्या बाजुला बसून एक पक्षी त्यांच्याकडे एकटक बघताना दिसून येतोय. जणू काही तो त्या वृद्ध व्यक्तीसोबत अगदी मित्राप्रमाणे गप्पा मारतोय. हा मजेदीर फोटो सध्या नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. तसंच या फोटोवर वेगवेगळे मीम्स देखील व्हायरल होत आहेत. हे मीम्स वाचून तुम्हाला नक्कीच हसू आवरता येणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जेव्हा तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात स्वतःसाठीचा निवांत वेळ घालवण्यासाठी जाता, त्यावेळी त्या क्षणाचा आनंद घेता यासाठी सोबत काही ना काही घेऊन जातो. पण एका पार्कमध्ये निवांत क्षणाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या वृद्ध व्यक्तीच्या व्हायरल फोटोने सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घातला आहे. या विचित्र फोटोनं सोशल मीडियावरील नेटिझन्सचं लक्ष वेधून घेतलंय. या फोटोची सध्या चर्चा सुरू असून यावर वेगवेगळे मजेदार मीम्स व्हायरल होत आहेत.

या फोटोमध्ये वृद्ध व्यक्ती एका पार्कमध्ये निवांत वेळ घालवण्यासाठी एका बेंचवर बसलेले दिसून येत आहेत. कानाला मोठे हेडफोन लावून ते गाण्यांचा मनमुराद आनंद घेताना दिसून येत आहेत. हे पाहून तिथे एका पक्षी येतो आणि त्याच बेंचवर बसतो. फोटोमधल्या आजोबांच्या अगदी बाजुलाच हा पक्षी येऊन बसतो आणि त्यांच्याकडे टकमक पाहत राहतो. आपल्या बाजुला बसलेला आलेल्या पक्ष्याला पाहून आजोबा सुद्धा त्या पक्ष्याकडे पाहत असतात. या फोटोमधील आजोबा आणि पक्षी दोघेही या बेंचवर बसून एकमेकांशी गप्पा मारत बसले आहेत की काय असाच भास हा फोटो पाहून होतो.

या पक्षीचं नाव ‘पेलिकन’ असं असून त्याला मराठीत ‘झोळीवाला’ म्हणतात. पेलिकन कुळातील पक्ष्यांना मोठी चोच असते व पिशवीसारखा गळा असतो. बहुतेक पक्षी फिकट रंगाचे असतात. विणीच्या हंगामात त्यांची चोच, गळा पिशवी व चेहेर्‍यावरील उघडी कातडी गडद रंगाची होते. झोळीवाल्यांच्या आठ प्रजाती आहेत. करड्या-भुऱ्या पांढरा रंगाचा हा पक्षी आकाराने साधारण गिधाडापेक्षा मोठा म्हणजे सुमारे १५२ सेंमीचा असतो. पार्कमध्ये माणसांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो तरीही अशा ठिकाणी या पक्ष्याच्या उपस्थितीने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. निसर्गच्या सानिध्यात मोकळा वेळ घालवण्यासाठी गेलेल्या आजोबांना ‘झोळीवाला’ दिसल्यामुळे आश्‍चर्य व आनंद व्यक्त केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो लंडनमधल्या प्रसिद्ध सेंट जेम्स पार्कमधला असून सुप्रसिद्ध छायाचित्रकार लिन यांनी हा क्षण त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केलाय. त्यानंतर पत्रकार एलेनॉर ओल्कोट यांनी हा फोटो ट्विटरवर शेअर केला. त्यानंतर या मजेदार फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली. आपण बसलेल्या बाकावर बाजुला भलामोठा पक्षी येऊन बसलेला पाहून आजोबांच्या चेहऱ्यावरचे एक्प्रेशन्सवर सोशल मीडियावर वेगवेगळी मीम्स देखील व्हायरल होत आहेत.

सेंट जेम्स पार्कच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, “रशियन राजदूताने भेट म्हणून १६६४ मध्ये उद्यानाची पहिल्यांदा ओळख करून दिली, त्यानंतर ४० हून अधिक पेलिकन पक्ष्यांनी या उद्यानाला आपलं घर बनवलं आहे.” तसंच या पार्कमधले रहिवासी पक्षी पेलिकन हे त्यांच्या समुहाच्या बाहेरील सर्वांसोबत फ्रेंडली असतात, पण कधी कधी ते त्रास सुद्धा देऊ लागतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bird viral photo man by a huge pelican at a park triggers memes prp