प्रत्येक व्यक्तीसाठी आपला वाढदिवस हा उत्साहाने भरलेला दिवस असतो. अनेकांना या दिवशी मनातील अनेक इच्छा पूर्ण करायच्या असतात, या दिवसाचा मनसोक्त आनंद घ्यायचा असतो. आजकालची तरुणाई असो वा वयस्कर लोक प्रत्येकजण आपापल्या वाढदिवसानिमित्त जवळच्या मित्रांबरोबर जोरदार पार्टी करण्याचा प्लॅन करतात, यावेळी ते आवडीचे पदार्थ खातात आणि डान्सही करतात. मात्र, अतिउत्साहीपणामुळे अनेकजण असं काही करतात, ज्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतात. याचेच एक उदारहण सध्या एका व्हिडीओमध्ये पाहायला मिलत आहे, या व्हिडीओतील तरुणीला अतिउत्साही चांगलाच महागात पडल्याचं दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुणी तिचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. मात्र, यावेळी ती अतिउत्साहात स्वत:चा जीव धोक्यात घालते, त्यामुळे कोणताही आनंद साजरा करताना निष्काळजीपणा किती महागात पडू शकतो ते हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येत आहे. व्हिडीओतील तरुणी वाढदिवसाची खास टोपी घालून डान्स करताना दिसत आहे. आधी ती जमिनीवर जोरदार डान्स करताना दिसत आहे. मात्र काही वेळाने ती अतिउत्साहात घरातील एका उघड्या खिडकीवर चढते आणि तिथे ती नाचायला सुरुवात करते. मात्र यावेळी तिचं स्वत:वर नियंत्रण राहत नाही आणि ती खिडकीतून थेट खाली कोसळते.
तरुणी नाचता नाचता खिडकीवर चढते अन्…
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तरुणी डान्स करण्यासाठी खिडकीवर चढते. त्यानंतर अचानक तिचा तोल बिघडतो आणि ती खाली पडते. तरुणी खाली पडल्यानंतर तिचे काय झाले याबाबतची काही माहिती मिळालेले नाही. मात्र, तिला गंभीर दुखापत झाली असेल याचा अंदाज व्हिडीओ पाहिल्यानंतर लावता येवू शकतो. कारण खिडकीच्या पलीकडे जाड लोखंडी पाइप दिसत आहेत, मुलगी पडताना या पाईपला धडकून खाली पडते.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
तरुणी खिडकीतून खाली पडल्याचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. शिवाय अनेकजण या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिलं आहे की, या अपघातामधून ती जर वाचली असती तर पुन्हा अशी चूक करणार नाही.’ तर दुसऱ्या लिहिलं, “डान्सिंग मिशन अयशस्वी झाले.”