Virl video: वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात आवडता दिवस असतो. या दिवशी जवळपास प्रत्येकालाच खूप स्पेशल ट्रिटमेंट मिळते. हा दिवस संस्मरणीय बनवण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना लढवल्या. कोणी खास केक कापून वाढदिवस साजरा करतं तर कोणी वाढदिवसाचं हटके सेलिब्रेशन करतं. मात्र असंच एक वाढदिवसाचं सेलिब्रेशन तरुणीच्या जीवावर बेतलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. केक कापताना एक मेणबत्ती पेटवली अन् होत्याच नव्हतं झालं. थरकाप उडवाणारा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका तरुणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिचे सर्व मित्रमंडळी जमल्याचं दिसत आहे. तसेच वाढदिवसानिमित्त छान डेकोरेशनही केलं आहे. तिच्या मागे संपूर्ण भींत ही फुग्यांनी डेकोरेट केली आहे. सर्व व्यवस्थित सुरु असताना सगळे केक कापण्यासाठी सज्ज होतात. मात्र उत्साहात केलेलं फुग्यांचं डेकोरेशन घात करेल असं कुणालाही वाटलं नव्हतं.

एका मेणबत्तीनं होत्याचं नव्हतं

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तरुणी केक कापायला सुरुवात करणार तेवढ्यात केकवर लावलेली मेणबत्ती पेटवण्यात आली. यावेळी जशी मेणबत्ती पेटवली तसं फुग्यांनी पेट घेतला आणि जोरदार स्फोट झाला. यावेळी मोठी आग सर्वत्र पसरली. या व्हिडीओमध्ये तरुणीच्या किंचाळ्या एकू येत आहेत. तसेच पुढे ती स्वत:चा जीव वाचवून इकडे तिकडे पळतानाही दिसत आहे. आगीवर वेळीच नियंत्रण आल्याने तोंड जळता जळता थोडक्यात बचावलेय. दरम्यान, बर्थडे गर्लच्या तोंडाला आग लागतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बाबो! पठ्ठ्यानं एकाच वेळी केलं ४ मुलींशी लग्न; सात फेरे घेतानाचा VIDEO होतोय व्हायरल

लग्नसमारंभ आणि वाढदिवसाच्या पार्टीत वापरले जाणारे स्प्रे अत्यंत ज्वलनशील असतात. त्याच्या ज्वलनशीलतेचे कारण म्हणजे त्यात वापरलेले अल्कोहोल. अल्कोहोल हे ज्वलनशील रसायन असल्याने ते अनेक प्रकारे वापरले जाते

अपघात आणि दुर्घटना या सांगून येत नसतात. कधी कोणती घटना घडेल याचा नेम नसतो. आणि अशा दुर्घटनेचे काय परिणाम होईल याचा अंदाजही नसतो. कधी कधी अशा दुर्घटना जीवावर बेतणाऱ्याही असतात. तर काही दुर्घटनेतून अनेकजण आश्चर्यकारकरित्या वाचलेले असतात. त्यामुळे प्रत्येकवेळी जपून राहणे हाच त्यावर एकमेव पर्याय आहे. दुर्घटना होऊ द्यायच्या नसतील तर सावधगिरी बाळगणं महत्त्वाचं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Birthday party accident viral video cake fire stick blast on girl fire news srk