तुम्ही नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असाल तर तुम्हाला माहीत असेल की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे. अनेक कलाकार एआय टूल्स वापरून नवनवीन फोटो पोस्ट करत असतात. विशेष म्हणजे प्रत्येक फोटोमागील मूळ कल्पना इतकी अफलातून असते की, ज्याची कधी कोणी कल्पनादेखील केली नसेल. भारतीय क्रिकेटपटू सुपरहिरोच्या भूमिकेत असते तर कसे दिसले असते, भारतीय अभिनेत्री म्हाताऱ्या झाल्या तर कशा दिसतील, अब्जाधीश लोक गरीब असते तर कसे दिसले असते… अशा एक ना अनेक कल्पनांवर आधारित एआय फोटो तुम्ही पाहिले असतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असे अनेक कलाकार आहे जे सोशल मीडियावर नियमित अशा भन्नाट कल्पनांवर आधारित एआय फोटो तयार करून शेअर करतात. यांपैकीच एक ‘एआय’ कलाकार म्हणजे साहिद(sahixd). मिडजर्नी नावाचे ‘एआय टूल’ वापरून या कलाकाराने अफलातून फोटो तयार केले आहेत. भारतातील विविध शहरांतील मेट्रोप्रवासाची झलक त्याने या फोटोतून दाखवली आहेत. यामध्ये हैदराबाद, बिहार, काश्मीर, नागपूर, बेंगळुरू, मुंबई, ओडिशा, उत्तर प्रदेश, कोलकाता, गुजरात, केरला, दिल्ली आणि राजस्थान या शहरांचा समावेश आहे. साहिदने या शहारांमधील मेट्रोप्रवास कसा असेल याची कल्पना करून काही अफलातून एआय फोटो तयार केले आहेत. यामध्ये प्रत्येक राज्याची परंपरा, खाद्य, संस्कृती आणि विकास उत्तम प्रकारे दाखवण्यात आले आहेत.

एआयने तयार केलेल्या या फोटोंमध्ये तुमच्या राज्यातील मेट्रोचे किती सुंदर वर्णन केले आहे ते तुम्हीदेखील पाहा.

१. बिहार मेट्रो

बिहारच्या मेट्रोमध्ये प्रंचड गर्दी दिसत आहे आणि त्यात एक व्यक्ती तेथील प्रसिद्ध लिट्टी या खाद्यपदार्थाची विक्री करत असल्याचे दिसत आहे.

२. काश्मीर मेट्रो

काश्मीरच्या मेट्रोमध्ये बर्फवृष्टी होत असून सगळीकडे बर्फ पसरलेला दिसत आहे आणि लोक थंडीचे कपडे परिधान करून प्रवास करत आहेत.

३. हरियाणा मेट्रो

हरियाणा या मेट्रोमधील प्रवाशांनी स्थानिक पेहराव परिधान केलेला दिसत असून त्यांच्या हातात काठ्या आहेत. हे सर्व खाप पंचायतचे लोक असल्याचे दिसत आहे.

४. छत्तीसगढ मेट्रो

छत्तीसगढ मेट्रोमध्ये हातात बंदूक घेऊन, काळ्या कापडाने चेहरा झाकलेल्या नक्षलवाद्यांनी कब्जा केल्याचे दिसत आहे.

५. ओडिशा मेट्रो

ओडिशामध्ये येथील संस्कृतीची झलक दाखवली आहे.

६. सूरत मेट्रो

सूरतच्या मेट्रोमध्ये हिरे आणि हिऱ्यांच्या व्यापाऱ्यांची गर्दी दिसत आहे.

७. कन्याकुमारी मेट्रो

या मेट्रोमध्ये सुंदर तरुणी प्रवास करताना दिसत आहेत, ज्यांनी पांरपरिक पद्धतीने साडी नेसलेली आहे.

८. हैदराबाद मेट्रो

हैदराबाद मेट्रोमध्ये तेथील खाद्यसंस्कृतीची झलक दाखवली आहे. मेट्रोमध्ये बिर्याणीचा थर लावलेला आहे आणि प्रवासी तिचा आनंद घेत आहेत.

९. बंगळुरू मेट्रो

बंगळुरू मेट्रोमध्ये आयटी प्रोफेशनल्सची गर्दी दिसत आहे, जे सूट-बूट परिधान करून आले आहेत.

१०. कानपूर मेट्रो

कानपूर मेट्रोमध्ये पान-गुटख्याची विक्री केली जात आहे.

हेही वाचा – घृणास्पद! वापरलेले कंडोम महिलांना पाठवतोय विकृत व्यक्ती; वाचा नेमकं काय आहे प्रकरण!

११. यूपी मेट्रो

उत्तर प्रदेशच्या मेट्रोमध्ये लोक हत्यारे घेऊन प्रवास करताना दिसत आहेत.

१२. कोटा मेट्रो

कोटाच्या मेट्रोमध्ये अभ्यास करून वैतागलेले विद्यार्थी दिसत आहे.

१३. नागपूर मेट्रो

नागूपर मेट्रो तेथील प्रसिद्ध संत्र्यांनी भरलेली दिसत आहे.

१४. चेन्नई मेट्रो

चेन्नई मेट्रोमध्ये रजनीकांतचे चाहते त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांच्या पेहरावात दिसत आहेत.

१५. कोलकाता मेट्रो

कोलकाता मेट्रोमध्ये एक व्यक्ती हातात मासे घेऊ विकताना दिसत आहे.

१६. राजस्थान मेट्रो

राजस्थान मेट्रोमध्ये वाळवंटातील रेती पसरलेली दिसत आहे तसेच येथे माणसांसोबत उंटदेखील मेट्रोने प्रवास करत आहेत.

१७. मुंबई मेट्रो

मुंबई मेट्रोमध्ये सर्वांच्या आवडत्या वडा-पावची विक्री होत असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा – “ही खरी माणुसकी” महिलेने बसमध्येच दिला बाळाला जन्म; कंडक्टरने केली प्रसुती, IAS ने केले कौतुक, म्हणाली..

१८. गुजरात मेट्रो

गुजरातच्या मेट्रोमध्ये लोक ढोकळा हा आवडता नाश्ता खाताना दिसले.

१९. केरळ मेट्रो

केरळच्या मेट्रोमध्ये लोक सोबत नारळ घेऊन प्रवास करताना दिसत आहेत.

२०. दिल्ली मेट्रो

दिल्लीच्या मेट्रोमध्ये आजकाल सुरू असलेल्या घडामोडींची झलक दिसत आहे. ज्यामध्ये एक जोडपे एकमेकांना किस करत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Biryani in hyderabad vada pav in mumbai artist creates ai pic metros in 20 city of india snk
Show comments