जगात खाद्यपदार्थ आवडीने खाणारे अनेक लोक आहेत. कित्येक लोकांना नवनवीन पदार्थ तयार करायला आवडतात आणि काहीन नवीन पदार्थ तयार करायालाही आवडता. त्या नादात कित्येकजण खाद्यपदार्थांवर नवनवीन प्रयोग करत असतात. अनेक विचित्र खाद्यपदार्थ तुम्ही आतापर्यंत सोशल मीडियावर पाहिले असतील. दरम्यान सध्या असाच एक विचित्र खाद्यपदार्थांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे तो म्हणजे बिस्किट भजी. होय ऐकून विश्वास बसणार नाही पण व्हायरल व्हिडीओ पाहून लोकांनाही धक्का बसला आहे. व्हिडीओमध्ये एक महिला बिस्किटमध्ये बटाट्याच्या भाजी भरून त्याचे भजी तळताना दिसत आहे.विचित्र प्रयोग पाहून नेटकरी चांगलेच भडकले आहेत.

व्हिडीओमध्ये एक महिला, बिस्किट बेसनाच्या पीठात बुडवाना दिसते आहे आणि नतंर तेलात तळते. भजी तयार करण्यासाठी महिने आधी बटाटे उकडून घेतले त्यानंतर त्याची साल काढून. गरम तेलात कांदा, मिर्ची, मसाल्याची फोडणी देऊन त्यामध्ये बटाटा टाकते आणि त्याची भाजी तयार करतेय त्यानंतर ही भाजी दोन बिस्किटांच्यामध्ये भरते आणि ते बिस्किट बेसनात बुडवून तेलात तळते. शेवटी तयार बिस्किट सॉससह सर्व्ह करते.

हेही वाचा – ‘दिलदार बॉस’ने दिला हटके दिवाळी बोनस! फार्मा कंपनीच्या मालकाने कर्मचाऱ्यांना भेट दिल्या नव्या कोऱ्या १२ कार

व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. ट्विटरवर @Shayarcasm नावाच्या अकांउटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये २० हजार जास्त लोकांना पाहिला आहे. ३ नोव्हेंबरला शेअर केलेला व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. लोक व्हिडीओवर मजेशील कमेंट करत आहेत.

हेही वाचा – ना कधी शाळेत गेली, ना कधी शिक्षण घेतले तरीही फाडफाड इंग्रजी बोलतेय ‘ही’ गावातील महिला, Video Viral

व्हिडीओवर एक यूजर कमेंट करतो, “नवीन प्रयोग बिस्किट भजी …हाहाहा.” दुसरा म्हणतो , “हे कोण खाणार आहे साहेब” तिसरा म्हणतो, “हा सर्व फक्त दिखावा आहे, लोकांनी पाहावे यासाठी, हे कोणीही खाणार नाहीये”