3 Drunk Women Assault & Abuse Police In Virar : मुंबईतील विरारमध्ये एका बार ॲण्ड रेस्टॉरंटबाहेर तीन मद्यपी महिलांनी धिंगाणा घातल्याची घटना घडली आहे. मद्यपी महिलांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. यावेळी पोलिसांना शिवीगाळ करीत मद्यपी महिलांनी पोलीस कर्मचाऱ्याचा गणवेश फाडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करीत तीन महिलांना अटक केली. ही घटना विरार पश्चिमेकडील गोकुळ टाऊनशिपमधील पंखा बार ॲण्ड रेस्टॉरंटबाहेर घडली. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, तीन मद्यपी महिलांनी बारमधील इतर ग्राहकांशी वाद घातला. त्यामुळे त्या तीन महिलांना बारमधून बाहेर जाण्यास सांगण्यात आले. परंतु, त्या तिघींनी बारबाहेर जाताच भररस्त्यात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर अर्नाळा सागरी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले.

sexual assault at anna university
Chennai Crime: चेन्नईत रस्त्यावरील ठेलेवाल्याचा कॉलेज कॅम्पसमध्येच विद्यार्थिनीवर बलात्कार; सत्ताधाऱ्यांशी संबंध असल्याचा विरोधकांचा आरोप!
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
Suspension of police, police indecent behaviour with girl,
पुणे : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन
mcoca action against Chuha Gang, Pune, Chuha Gang,
पुणे : दहशत माजविणार्‍या ‘चूहा गँग’वर मोक्का कारवाई, आंबेगाव पोलिसांची कारवाई
kalyan east minor girl rape case
कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी दोन जण अटक, दाढी करून पेहराव बदलत असताना विशाल गवळीवर पोलिसांची झडप

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, पोलिस घटनास्थळी पोहोचत मद्यधुंद अवस्थेतील तीन महिलांनी महिला पोलीस आणि इतर कर्मचारी, अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत त्यांना अश्लील शिवीगाळ केली. त्यातील एका महिलेने एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा गणवेश पकडून फाडला आणि त्यांना धक्काबुक्की करून शर्टची कॉलर पकडली, तसेच मनगट व कोपराला जोरात चावा घेतला. त्यातील दुसऱ्या मद्यपी महिलेने महिला पोलीस कर्मचाऱ्याचे केस ओढले. भर रस्त्यात रात्रीच्या वेळी ही घटना घडली, या मद्यपी महिलांना आपण का वागतोय याचे कसेच भान नव्हते.

विमानात लोकल ट्रेन स्टाइल तुफान राडा! प्रवासी रागात सीटवरुन उठला अन् थेट…; Video व्हायरल

यावेळी वाद सोडविण्यासाठी आलेल्या रेस्टॉरंटमधील महिला सुरक्षा कर्मचाऱ्यालाही धक्काबुकी करून तिचा टी-शर्ट फाडला. यावेळी तिसऱ्या मद्यपी महिलेने धक्काबुक्की करून शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच पोलिस कर्मचाऱ्याच्या डोक्यात, खांद्यावर हल्ला केला आणि डाव्या हाताला मनगटाजवळ चावा घेतला.

या प्रकरणी तिन्ही आरोपी मद्यपी महिलांना अटक करून, त्यांच्याविरोधात अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात आयपीसीच्या कलम ३५३, ३२३, ३२५, ३३२, ५०४, ५०६ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काव्या प्रधान, अश्वीनी पाटील आणि पूनम असे या तीन महिला आरोपींची नावे आहेत. या आरोपी महिलांना सोमवारी वसई न्यायालयात हजर केले असता, त्यांना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान

Story img Loader