Man Smokes 15 Cigarettes In One Time : धुम्रपान आणि नशा आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. लोकांमध्ये याबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी सरकार सर्व उपाय अवलंबते, परंतु तरीही काही लोक हे होणाऱ्या सर्व परिणामांची जाण असताना सुद्धा धूम्रपान आणि अंमली पदार्थांचे सेवन करतात. धुम्रपान आणि मद्यपान या दोन्ही अशा सवयी आहेत ज्या एकदा कुणाला लागली की, पटकन सुटत नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

अभिनेता शाहिद कपूरचा ‘कबीर सिंग’ हा चित्रपट तुम्ही पाहिला असेलच. या चित्रपटातल्या कबीर सिंगसारखाच चैन स्मोकर असलेला एक आधुनिक युगातला कबीर सिंग नेटकऱ्यांनी शोधून काढलाय. हा नव्या युगातला कबीर सिंग एकाचवेळी दोन तीन नव्हे तर चक्क १५ सिगारेट ओढताना दिसला. तसंच चित्रपटातल्या कबीर सिंगप्रमाणेच याने त्याची दाढी वाढवलेली दिसत आहे. एकाच वेळी १५ सिगारेट हा माणूस कसा काय ओढत असेल, असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल. तर एकाच वेळी १५ सिगारेट ओढण्याची या पठ्ठ्याची स्टाईल तर काही निराळीच आहे. कबीर सिंग चित्रपटातल्या शाहिद कपूरसारखीच हूबेहूब स्टाईल कॉपी करत हा व्यक्ती सिगारेट ओढताना या व्हिडीओमध्ये दिसतोय.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : वाघ जेव्हा भडकलेल्या वाघिणीसमोर उंदरासारखा होतो तेव्हा…

या व्हायरल व्हिडीओमधल्या कबीर सिंगने तर अभिनेता शाहिद कपूरला सुद्धा मागे टाकलंय. चित्रपटात शाहिद कपूर दोन सिगारेट पिताना दिसतोय, तर हा व्यक्ती त्याच स्टाईलने एकाच वेळी तब्बल १५ सिगारेट ओढतोय. हा व्हायरल व्हिडीओ पाहून सारेच जण हैराण होऊ लागले आहेत. १५ सिगारेट एकाच वेळी ओढूनही हा व्यक्ती एकदम ठणठणीत दिसतोय.

आणखी वाचा : सेम टू सेम लहान बाळासारखा रडतो हा पक्षी, VIRAL VIDEO पाहूनही तुमचा विश्वास बसणार नाही!

Sk.Majhar नावाच्या युजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यानंतर बघता बघता हा व्हिडीओ व्हायरल देखील झालाय. या व्हिडीओला आतापर्यंत ३.९ मिलियनहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ लाख ९४ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाइक केलं आहे. लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

आणखी वाचा : गर्मी में ठंड का एहसास! उन्हामुळे हैराण झालेल्या साधू बाबाने शोधला सौरउर्जेवर चालणारा पंखा असलेलं हेल्मेट

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : तलवारीने केक कापणे महागात पडले; १९ वर्षाच्या बर्थ डे बॉयविरोधात गुन्हा दाखल

सोशल मीडियावर हा व्हिडीओ रिपोस्ट करताना एका यूजरने लिहिले आहे की, कोणीतरी हे थांबवा. दुसर्‍या यूजरने लिहिले की, “माणसाचा जीव सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे.” तिसऱ्या यूजरने लिहिले, “हा माणूस चेनस्मोकर्ससाठी नवीन रेकॉर्ड सेट करत आहे.” आणखी एका युजरने म्हटले आहे की, “इतक्या सिगारेट ओढल्यानंतर त्याच्या तब्येतीवर काय परिणाम होईल?” अनेकांनी तर सिगारेट पिण्याने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम देखील सांगितले आहेत.

Story img Loader