BJP Cabinet Minister Drawing Photo: महाराष्ट्रात मागील काही वर्षांपासून सातत्याने सुरु असणारे राजकीय नाट्य पाहिल्यास कधी कोणत्या नेत्याचा पक्षबदल सोहळा होईल याचा अंदाज बांधणे तसे कठीणच आहे. या चर्चा आपणही केल्या असतील, ऐकल्या असतील. अगदी एखाद्या नेत्याने केलेली लहानशी कृती सुद्धा मोठ्या राजकीय घडामोडी घडवू शकते हे ही आपण पाहिले आहे. एकीकडे सध्या महाराष्ट्रात काँग्रेसचा हात सोडून भाजपाचे कमळ हातात घेतलेले नेते अशोक चव्हाण चर्चेत आहेत तर केंद्रीय स्तरावर सुद्धा भाजपाच्या खासदारांच्या एका फोटोवरून चर्चा रंगली आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या हातात ब्रश घेऊन रेखाटलेले एक चित्र पाहता आता भाजपात सुद्धा बंडखोरी होणार का असा प्रश्न नेटकऱ्यांकडून केला जात आहे.

लाइटहाऊस जर्नलिझमला भारतीय राजकारणी आणि शिक्षण मंत्री आणि भारत सरकारमधील कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री, धर्मेंद्र प्रधान यांचा एक फोटो व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. यामध्ये प्रधान हे भिंतीवर शंखाचे चित्र काढताना दिसतात. धर्मेंद्र प्रधान हे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आहेत. आणि शंख हा ओडिशातील प्रादेशिक पक्ष असलेल्या बिजू जनता दलाचे निवडणूक चिन्ह आहे. त्यामुळे कमळाच्या ऐवजी शंख काढून प्रधान यांना नेमका काय संकेत द्यायचा आहे असं नेटकरी विचारत आहेत. पण नेमकं या फोटोचं सत्य काय हे पाहूया ..

uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
कसब्यात एक ॲक्सिडेंटल आमदार तयार झाला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार रविंद्र धंगेकर यांना टोला
Election Commission officials check the helicopter of Union Home Minister Amit Shah
Amit Shah: आता थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी; उद्धव ठाकरेंप्रमाणेच व्हिडीओ पोस्ट करत म्हणाले..
Narendra Modi Kharghar, Narendra Modi latest news,
पंतप्रधानांच्या आगमनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत सरकारची स्वच्छ खारघर मोहीम सुरूच
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई
wani vidhan sabha constituency BJP kunbi statement bag inspection
वणीत भाजपमागे शुक्लकाष्ठ, कुणबी वक्तव्यानंतरचे बॅग तपासणी प्रकरण अंगलट येण्याची शक्यता

काय होत आहे व्हायरल?

X यूजर Sanghamitra panda ने वायरल चित्र आपल्या प्रोफाइल वर शेअर केले.

इतर वापरकर्ते देखील हाच फोटो शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही रिव्हर्स इमेज सर्चने आमचा तपास सुरू केला आणि समजले की इमेजमध्ये दिसणारी व्यक्ती धर्मेंद्र प्रधान आहे. प्रधान हे मध्य प्रदेशचे प्रतिनिधीत्व करणारे लोकसभा सदस्य आणि मोदी सरकारमधील शिक्षण, कौशल्य विकास व उद्योजकतेचे कॅबिनेट मंत्री आहेत.

https://www.msde.gov.in/en/ministers/profile-honble-minister

आम्ही मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे सोशल मीडिया हँडल तपासले त्यांच्या X प्रोफाइलवर शोध घेतल्यानंतर आम्हाला मूळ फोटो सापडला.

उत्तर भुवनेश्वरमध्ये भाजपच्या कांठ लेखन कार्यक्रमात सहभागी झाल्याचा उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. आम्हाला याबद्दल काही बातम्या देखील आढळल्या.

https://argusenglish.in/article/odisha/pradhan-launches-kantha-likhan-in-deogarh-draws-lotus-on-wall
ବିଜେପିର ‘କାନ୍ଥ ଲିଖନ’ କାର୍ଯ୍ୟକ୍ରମର ଶୁଭାରମ୍ଭ, ରଙ୍ଗ ତୁଳି ଧରି କାନ୍ଥରେ ପଦ୍ମ ଫୁଲ ଆଙ୍କିଲେ କେନ୍ଦ୍ରମନ୍ତ୍ରୀ ଧର୍ମେନ୍ଦ୍ର ପ୍ରଧାନ

आम्हाला त्यांच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर प्रोग्रामबद्दल एक रील देखील सापडला.

निष्कर्ष: व्हायरल फोटो ज्यामध्ये केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान वेगळ्या पक्षाचे चिन्ह काढताना दिसत आहेत ते एडिटेड आहे. व्हायरल फोटो खोटा आहे.