-अंकिता देशकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

BJP Congress Controversial Image: इंडियन एक्सप्रेसला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होणारी दोन व्यंगचित्रे पाहायला मिळाली. या दोन्ही व्यंगचित्रांचे श्रेय प्रख्यात अमेरिकन व्यंगचित्रकार बेन गॅरिसन यांना देण्यात आले.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर सज्जन एच सिंगने एक कार्टून शेअर करत हिंदीत मजकूर लिहिला आहे की, “अमेरिकन व्यंगचित्रकार बेन गॅरिसन यांनी त्यांच्या व्यंगचित्रात काँग्रेसच्या ७० वर्षांची कहाणी मांडली आहे. आणखी एका व्यंगचित्रात थोडेफार बदल करून ‘काँग्रेस’ऐवजी ते व्यंगचित्र भाजपचे असल्याचे सांगण्यात आले.”यावरून व्यंगचित्रकार बेन गॅरिसनवर बंदीची मागणी करण्यात येत होती.

तपास:

आम्ही फोटोवर गूगल रिव्हर्स इमेज सर्चसह तपास सुरू केला. राकेश कृष्णन सिन्हा या ट्विटर वापरकर्त्याचे ट्वीट आम्हाला आढळले. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ” हे चित्र बेन गॅरिसनने काढलेले नाही. अमल मेधी यांच्या व्यंगचित्राची ही एडिट केलेली आवृत्ती आहे. त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाला लक्ष्य केले नाही. पण टाईम स्टॅम्प २०१५ दाखवतो त्यामुळे ते भाजपला टार्गेट करत असल्याचे स्पष्ट होते. बहुतेक मार्क्सवाद्यांप्रमाणे, तो भित्रा आहे आणि तो चित्राचा हेतू स्वीकारणार नाही. पण एडिट केलेले कार्टून सत्य दाखवते.”

अमल मेढी प्रोफाईलवरील इमेजचा स्क्रीनशॉटही शेअर केलेला आहे. गायीचे चित्र ‘मेक इन इंडिया’ वर आधारित आहे आणि कोणत्याही भारतीय राजकीय पक्ष्याला लक्ष केलेला नाही.

आम्हाला अमल मेढीचे फेसबुक पेज सापडले. आम्हाला २९ सप्टेंबर २०१५ रोजी त्यांच्या फेसबुक प्रोफाइलवर पोस्ट केलेले मूळ व्यंगचित्र सापडले. दरम्यान आम्हाला अमेरिकन व्यंगचित्रकार, बेन गॅरिसन यांचे ट्विटर प्रोफाइल देखील सापडले, त्यांनी यापूर्वी या चित्रावर टिप्पणी केली होती की नाही हे तपासण्यासाठी तर त्यांचे हे खाते निलंबित करण्यात आले आहे असे आम्हाला कळले.

आम्हाला बेन चे एक आर्काइव्ह केलेले ट्विट सापडले, त्यात लिहिले होते, “नाही- मी कधीही भारताच्या राजकारणावर कोणतेही व्यंगचित्र काढले नाही- काही व्यंगचित्रे आहेत ज्यात माझ्यासारखी स्वाक्षरी आहे पण ती माझी नाही”

आम्ही बेन गॅरिसनची वेबसाइट देखील तपासली, आम्हाला कोणतेही व्यंगचित्र आढळले नाही. इंडियन एक्सप्रेसने प्रतिक्रियेसाठी बेन गॅरिसन यांच्याशी संपर्क साधला होता. ईमेलला उत्तर देताना टीना गॅरिसन म्हणाल्या, ” ती व्यंगचित्रे बेन गॅरिसनची व्यंगचित्रे नाहीत आणि ती त्याच्या कला शैलीशी जुळणारीही नाहीत. तसेच बेन गॅरिसन भारतीय राजकारणावर काम करत नाहीत. जर कार्टून आमच्या साइट grrrgraphics.com वर नसेल तर, तुम्हाला माहित आहे की हे बनावट बेन गॅरिसन कार्टून आहे.”

हे ही वाचा<<अर्जुन तेंडुलकरचा मैदानातील किळसवाणा Video व्हायरल; फॅनने ‘ही’ नवी क्लिप दाखवत दिलं सडेतोड उत्तर

निष्कर्ष: अमेरिकन व्यंगचित्रकार बेन गॅरिसन यांचे श्रेय असलेले व्हायरल व्यंगचित्र एडिट केलेले आहे. हे व्यंगचित्र भारतीय व्यंगचित्रकार अमल मेढी यांनी बनवले आहे आणि गायीचे चित्रण ‘मेक इन इंडिया’ असे केले आहे, कोणत्याही राजकीय पक्षावर आधारित नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp giving poop to people and milk to adani ambani viral photos showing made in india cow american artist ben garrison straight reply svs