BJP Leader Beaten For Molesting Women: लोकसभा निवडणुकांचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा पार पडला असला तरी अद्यापही प्रचाराच्या सभा व भेटीगाठींचे अनेक व्हिडीओ ऑनलाईन व्हायरल होत आहे. लाइटहाऊस जर्नलिझमला यातीलच एक व्हिडीओ आढळून आला ज्यात एका व्यक्तीला मारहाण होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये नंतर एबीपी न्यूजची क्लिप बघायला मिळते ज्यामध्ये उत्तराखंडमध्ये भाजप नेत्याला लोकांनी मारहाण केल्याचा उल्लेख केला आहे. आपल्या बहिणी लेकीची छेडछाड करणाऱ्या या नेत्याला चप्पलेने मारहाण केल्याचे कॅप्शन देत हा व्हिडीओ अनेक अकाउंट्सवर शेअर केला जात आहे. देश सुरक्षित हातांमध्ये आहे असा उपरोधक टोला सुद्धा यात लगावण्यात आला आहे. पडताळणीअंती या व्हिडीओची एक वेगळी बाजू समोर आली आहे. ही घटना खरी असली तरी हा संदर्भ चुकवून चालणार नाही. त्यामुळे पूर्ण तपास पाहूया..
काय होत आहे व्हायरल?
X यूजर Dr Satya Prakash Dubey ने व्हायरल विडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.
इतर वापरकर्ते देखील हा व्हिडीओ अलीकडील असल्याचा दावा करत शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही गूगल कीवर्ड सर्च वापरून व्हिडीओचा तपास सुरु केला. व्हिडीओमध्ये जोडलेल्या न्यूज क्लिपमध्ये ही घटना उत्तराखंडमध्ये घडल्याचे नमूद करण्यात आले आहे. एबीपी लाईव्हच्या वेबसाइटवर अपलोड केलेला व्हिडीओ आम्हाला आढळला.
व्हिडीओ ८ ऑक्टोबर २०१८ रोजी अपलोड करण्यात आला होता.
भाजप नेत्या अश्विनी अरोरा यांना विनयभंग केल्याप्रकरणी मारहाण केल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. त्याला एका आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीने चप्पलेने मारलं आणि त्याला कानाखाली सुद्धा लगावली असेही यात म्हटलेय. त्याने अनेक दिवस तिचा विनयभंग केल्याचा आरोप महिलेने केला होता अखेरीस तिने हिंमत एकवटून त्याला मारून आपला राग काढला अशी माहिती त्यात दिली आहे. हा व्हिडीओ dailymotion.com वर सहा वर्षांपूर्वी अपलोड करण्यात आला होता.
आम्हाला २०१८ मध्ये अमर उजालाच्या वेबसाइटवर अपलोड केलेला व्हिडीओ देखील सापडला.
आम्हाला टाईम्स ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर एक बातमी सापडली ज्यामध्ये भाजपा नेता अश्विनी अरोरा यांना नंतर निलंबित करण्यात आले असे सांगण्यात आले होते.
हे ही वाचा<< “काँग्रेस संपली, आता तुम्हाला कुठेही..”, मल्लिकार्जुन खरगे असं का म्हणाले? Video चा रोख भाजपावर पण घडलं उलटंच
निष्कर्ष: उत्तराखंडचे तत्कालीन भाजप नेते अश्विनी अरोरा यांना विनयभंगासाठी मारहाण केल्याचा जुना व्हिडिओ पुन्हा शेअर करण्यात आला होता. व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत.