BJP Leader Beaten In Village Video: लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर होत असल्याचे आढळले. मध्य प्रदेशातील भाजप पक्षाच्या एका नेत्याला स्थानिकांनी मारहाण केल्याचा दावा व्हिडिओसह केला जात होता. अंगरक्षकांना नेत्याला वाचवत न्यावे लागले पण तरीही लोकांनी गाडीचा पाठलाग करून गाडीवर दगडफेक व काठ्यांनी हल्ला केलाच. व्हिडिओचे स्क्रीनशॉट इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील शेअर केले गेले.

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर I.P. Singh ने व्हायरल व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Satish Wagh murder case, Satish Wagh Wife ,
सतीश वाघ खून प्रकरणात पत्नी सामील, मारेकऱ्यांना पाच लाखांची सुपारी; पत्नी गजाआड
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
tiger attack on cow
VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
injured young man share experience of dumper accident
पुणे : अचानक मोठ्या आवाजाने जाग आली आणि…, जखमी तरुणाचा अंगावर काटा आणणारा अनुभव
Loksatta lalkilla BJP Congress video viral Rahul Gandhi Amit Shah
लालकिल्ला : शहांची कोंडी आणि भाजप सैरावैरा!

इतर सोशल मीडिया यूजर्स देखील हा दावा आणि व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही InVid टूलमध्ये व्हिडिओ अपलोड करून आणि त्यातून अनेक स्क्रीनशॉट्स मिळवून आमचा तपास सुरु केला. व्हिडिओमध्ये फेसमास्कच्या वापरावरून असे दिसून आले आहे की व्हिडिओ महामारीच्या काळातील म्हणजेच, जुना असावा. मिळालेल्या कीफ्रेम्सवर अनेक रिव्हर्स इमेज सर्च चालवल्यानंतर आम्हाला ‘Nandighosh TV’ या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला व्हिडिओ सापडला.

व्हिडिओ चे शीर्षक होते, ‘Villagers of Dharampur chased a BJP candidate and drove him out of the village’.

आम्हाला Sangbad Pratidin या युट्युब चॅनेलवर देखील एक व्हिडिओ सापडला.

या व्हिडिओच्या शीर्षकामध्ये म्हटले होते की, बोलपूरमधून भाजपचे उमेदवार अनिर्बन गांगुली यांच्या ताफ्यावर हल्ला आम्ही याबाबत Google कीवर्ड वापरून शोध घेतल्यावर आम्हाला घटनेतील काही बातम्या सापडल्या.

https://bangla.hindustantimes.com/elections/west-bengal-assembly-election-2021/bjp-candidate-from-bolpur-anirban-ganguly-attacked-by-tmc-goons-31619700373993.html
https://bengali.abplive.com/elections/wb-election-2021-anirban-ganguly-car-broken-and-political-clash-in-bolpur-811968

या घटनेत दिसणारे नेते अनिर्बन गांगुली होते. घटनेनंतर त्यांनी पोस्ट केलेले एक ट्विट आम्हाला आढळले.

हे ट्वीट २९ एप्रिल, २०२१ रोजी करण्यात आले होते.

निष्कर्ष: पश्चिम बंगालमधील भाजप उमेदवाराचा पाठलाग करणाऱ्या ग्रामस्थांचा जुना व्हिडिओ निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेशातील असल्याचा दावा करत अलीकडेच शेअर केला जात आहे.

Story img Loader