महाराष्ट्रातले तडफदार आणि बिनधास्त नेते म्हणून उदयनराजे भोसले ओळखले जातात. कधी त्यांची कॉलर उडवणं असो किंवा त्यांचं रोखठोक बोलणं असो ते कायमच चर्चेत असतात. आता उदयनराजेंचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ते तुमसे मिलकर ना जाने क्यूँ हे गाणं म्हणताना दिसत आहेत.

काय आहे व्हायरल व्हिडीओत?

‘तुमसे मिलकर ना जाने क्यूँ और भी कुछ याद आता है’ हे गाणं उदयनराजे भोसले म्हणताना दिसत आहेत. उदयनराजे म्हणत असलेलं हे गाणं ‘प्यार झुकता नहीं’ या सिनेमातलं आहे. या सिनेमात मिथुन चक्रवर्ती आणि पद्मिनी कोल्हापुरे यांनी काम केलं आहे. उदयनराजे म्हणत असलेल्या गाण्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

२४ फेब्रुवारीलाही गायलं होतं गाणं

उदयनराजे भोसले यांनी २४ फेब्रुवारी २०२३ लाही एक गाणं म्हटलं होतं. तेरे बिना जिया जाये ना.. हे गाणं उदयनराजेंनी म्हटलं होतं. हा व्हिडीओही चांगलाच व्हायरल झाला होता. खासदार उदयनराजेंचा वाढदिवस होता त्या निमित्ताने त्यांना गाणं म्हणायची विनंती करण्यात आली. त्यावेळी त्यांनी हे गाणं म्हटलं होतं. त्यांचा हा व्हिडीओही चांगलाच व्हायरल झाला होता. तसंच एका शरीर सौष्ठव कार्यक्रमात उदयनराजेंनी कॉलरही उडवली होती.

उदयनराजेंना गाडी चालवणं आणि बॉक्सिंगची आवड

उदयनराजे भोसले यांना वेगाने गाडी चालवण्याची प्रचंड आवड आहे. फॉर्म्युला वनही त्यांना खूप आवडते. सातारा ते पुणे अंतर आपण ३५ मिनिटांत पार करु शकतो असं उदयनराजेंनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्याचप्रमाणे उदयनराजेंना बॉक्सिंगचीही आवड आहे. २००९, २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून आले. २०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत ते भाजपात गेले.