राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख यांनी बुधवारी बीकेसीमध्ये पक्षाच्या गटप्रमुखांचा मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसहीत भाजपावरही टीका केली. भाषणादरम्यान त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून ते शिवसेनेमध्ये उभी फूट पाडण्यात आणि भाजपासोबत सत्ता स्थापन करण्यात पुढाकार घेणाऱ्या एकनाथ शिंदेंपर्यंत सर्वाच विषयांना घात घातला. मात्र या भाषणादरम्यान उद्धव ठाकरेंनी केलेल्या एका विधानावरुन भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी संताप व्यक्त करताना यांना कानाखाली नाही मारायची तर काय पूजा करायची का? असं विधान केलं आहे.

नक्की पाहा >> ‘बाप चोरणारी टोळी’वरुन उद्धव Vs शिंदे: ‘ठेचा खाणाऱ्यांनी ठेचलं’, ‘आपण बापाचा पक्ष…’, ‘…असं आम्ही म्हणायचं का?’; ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबईबद्दल बोलताना उद्धव ठाकरेंनी मुंबई विमानतळावरील पुतळ्यासंदर्भात भाष्य केलं. उद्धव ठाकरेंनी मुंबई विमानतळावर एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि गडकिल्ल्यांची भिंत असल्याचं सांगितलं. तर दुसऱ्या बाजूला मुंबई देवीचा एक मोठा चेहरा लावलेला आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. “येताना मी बघत होतो विमानतळावरती. एक मेला आपण केलं ना शिव छत्रतींच्या पुतळ्याचं (अनावरण) शिवजयंतीच्या वेळेला. एक मे…” असं उद्धव यांनी म्हटलं. हे विधान करताना त्यांना संदर्भ देताना नेमकी तारीख आठवत नव्हती. त्यामुळे ते शिवजयंती की इतर कोणत्या तारखेला हे अनावरण करण्यात आलं याबद्दल मंचावर बसलेल्या इतर नेत्यांना पाठीमागे पाहून प्रश्नार्थ नजरेने माहिती विचारताना दिसले. त्यावेळी त्यांना कोणीतरी एक मे रोजी अनावरण झाल्याचं सांगितलं.

नक्की वाचा >> पत्रा चाळ प्रकरण : शरद पवारांच्या चौकशीच्या मागणीवर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “…त्यानंतर मी नक्की…”

या तारखेचा उल्लेख करतानाच पुढे बोलताना उद्धव यांनी, “एक मेला आपण केलं ना शिव छत्रतींच्या पुतळ्याचं (अनावरण) शिवजयंतीच्या वेळेला, एक मे” असं म्हणत पुन्हा समोर बसलेल्या समर्थकांकडे पाहिलं. पुढे भाषण सुरु ठेवताना उद्धव यांनी, “या बाजूने बघतो आपण की शिवछत्रपतींचा पुतळा आणि गडकिल्ल्यांची भींत आहे. पण पलिकडून येताना तुमच्यापैकी किती जणांनी पाहिलं असेल याची कल्पना नाही पण आपण मुंबादेवीचा मोठा चेहरा लावलेला आहे. मुंबादेवी ही आमची मुंबा आई आहे. जो आमच्या आईवर वार करायला येईल त्याचा राजकारणात कोथळा बाहेर काढण्याशिवाय आम्ही राहणार नाही,” असा इशारा विरोधकांना दिला.

नक्की वाचा >> शरद पवारांनी राज ठाकरेंच्या मर्मावर ठेवलं बोट; म्हणाले, “हाताच्या बोटावर मोजता येतील इतके सुद्धा…”

याच विधानाची १२ सेकंदांची क्लीप शेअर करत नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “यांना कानाखाली नाही मारायची मग काय यांची पूजा करायची?” अशा कॅप्शनसहीत नितेश राणेंनी ही क्लीप शेअर करताना, “नालायक” असा शब्दही ट्वीट केला आहे. टीव्ही ९ मराठीने दिलेल्या वृत्तानुसार नितेश राणेंनी उद्धव ठाकरे यांनी १ मे ची तारीख शिवजयंतीची असते या संदर्भातून हे टीका केल्याचं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> ठाकरे की शिंदे? दसरा मेळावा वादात संजय राऊतांची उडी; म्हणाले, “परवानगी मिळाली नाही तरी शिवसैनिकांनी…”

मागील वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन २४ ऑगस्ट रोजी संगमेश्वर येथे नितेश राणेंच्या वडीलांना म्हणजेच केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक करण्यात आलेली. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एका भाषणादरम्यान भारतीय स्वातंत्र्याचे हे कितवे वर्ष आहे यासंदर्भातील चुकीचा उल्लेख केल्याच्या मुद्द्यावरुन त्यांना कानाखाली लगावली पाहिजे होती, अशा अर्थाचं विधान केल्याने ही अटक करण्यात आलेली.

नक्की वाचा >> ‘हाताच्या बोटावर मोजण्याइतके सदस्य निवडून न आणणारे’ टीकेवरुन पवारांना मनसेचं उत्तर; म्हणाले, “आज बोटं मोजताय, उद्या…”

नारायण राणेंच्या या अटकेवरुन महाराष्ट्रात बराच राजकीय वाद झाला होता. त्याच विधानाच्या अप्रत्यक्षसंदर्भातून आता राणेंच्या आमदारपुत्राने पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.

Story img Loader