गंगापूर-खुलताबादचे भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांच्या मुलीचा विवाह नुकताच लासूर येथे पार पडला. या लग्नामध्ये बंब यांनी अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या डॉन या चित्रपटातील ‘पान बनारसवाला’ या गाण्यावर नृत्य केले. एक राजकारणी म्हणून समाजामध्ये वावरणाऱ्या बंब यांचे वेगळेच रुप यानिमित्ताने पहायला मिळाले. आपल्या मुलीच्या लग्नामध्ये आनंदाने नाचणाऱ्या पित्याची कौटुंबिक बाजू पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बंब म्हणजे सडपातळ देहयष्टी पण तितकाच दमदार बाणा आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने प्रश्न मांडण्याचे कौशल्यामुळे ते राजकारण्यांमध्ये लोकप्रिय आहेत. मात्र मुलीच्या लग्नात त्यांचे वेगळेच रुप पहायला मिळाले. आमदारच नाचायला लागल्यावर अनेकांनी त्यांचे हे नृत्य कॅमेरात टीपण्यासाठी मोबाईल बाहेर काढल्याचेही पहायला मिळाले. काही मिनिटं नाचून झाल्यानंतर अचानक आमदार साहेबांनी पाहुण्यांच्या घोळक्यातून एक्झीट घेत घराकडे वाटचाल सुरु केली.

मागील महिन्यामध्ये भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचाही असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मुलीच्या लग्नाआधी आयोजित करण्यात आलेल्या संगीत कार्यक्रमामध्ये मुनगंटीवार त्यांच्या पत्नीसोबत एका रोमॅन्टीक गाण्यावर नाचले होते. हा व्हिडिओही त्यावेळी चांगलाच व्हायरल झाला होता.