ईशान्य भारतामधील राज्यांबद्दल आणि तेथील लोकांबद्दल कायमच लोकांच्या मनामध्ये संभ्रम होता, असं मत भाजपाचे नागालॅण्डमधील अध्यक्ष आणि मंत्री तेमजेन इमना अलांग यांनी व्यक्त केलंय. एका भाषणामध्ये तेमजेन इमना अलांग यांनी अगदी मजेदार पद्धतीमध्ये ईशान्य भारतातील लोकांबद्दल असणारे गैरसमज या विषयावर भाष्य केलंय. विशेष म्हणजे या भाषणादरम्यान त्यांनी स्वत:च्या दिसण्यावर विनोद करताना, माझ्याकडे पाहून तर लोकांना आम्ही माणसं खातो की काय असा संशय येऊ लागला, असंही म्हटलं.

नक्की पाहा >> Video: …अन् काही क्षणांमध्ये गाडी पूराच्या पाण्यात वाहून गेली; असा मूर्खपणा कृपया करू नका

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९९९ च्या गोष्टी या मथळ्या खाली तेमजेन इमना अलांग यांनीच आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन स्वत:च्या भाषणामधील ४६ सेकंदांची क्लीप शेअर केली आहे. यामध्ये ते म्हणतात, “१९९९ मध्ये मी पहिल्यांदा दिल्लीत आलो. जेव्हा मी दिल्ली रेल्वे स्थानकावर उतरलो तेव्हा आमच्या नागालॅण्ड राज्यापेक्षाही अधिक लोकसंख्या याच ठिकाणी पाहिली. तिथेच मला आश्चर्याचा पहिला धक्का बसला” असं विधान केलं आहे. हे विधान ऐकून तेमजेन इमना अलांग यांच्यासमोर बसलेल्या श्रोत्यांपैकी काहीजण हसतानाचा आवाजही या व्हिडीओत ऐकू येतोय तर काही जण टाळ्या वाजवत असल्याचा आवाजही येतो.

नक्की पाहा >> जेव्हा मुख्यमंत्र्यांनाही पाणीपुरी स्टॉलवर पाणीपुरी बनवण्याचा मोह आवरत नाही; Video झाला Viral

“नागालॅण्ड कुठे आहे? तिथे जायला व्हिजा लागतो का?, असे प्रश्न लोक विचारायचे,” असंही ते या भाषणात म्हणाले. “काही लोकांनी तर असा अपप्रचार केला की नागा लोक माणसांना खातात,” असं भाजपाच्या या नेत्याने भाषणात म्हटल्यानंतर सारेच उपस्थित जोरात हसू लागले. त्यानंतर तेमजेन इमना अलांग यांनी स्वत:च्याच शरीरयष्टीवरुन शाब्दिक चिमटा काढत, “माझ्याकडे पाहिल्यावर तर लोकांना अधिक संशय येऊ लगाला,” असं म्हटल्यावर एकच हस्यकल्लोळ झाला. “दिसायला वेगळे, खाण्याच्या सवयींच्या बाबतीत वेगळे असं इथल्या लोकांना वाटायचं. पण आम्ही अशाच पद्धतीने ५० ते ६० वर्षे जगत आलो,” असंही या भाषणात पुढे तेमजेन इमना अलांग यांनी म्हटलंय.

नक्की पाहा >> पूर आलेल्या नदीतून विद्यार्थ्यांचा प्रवास; अंगावर काटा आणणारा Video व्हायरल झाल्यावर शिक्षणमंत्री म्हणतात, “मला…”

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून साडेसात हजारांहून अधिक वेळा तो रिट्विट करण्यात आलाय आणि त्याला एकूण ४ लाख ९१ हजारांहून अधिक व्ह्यूज आहेत. ४२ हजारांहून अधिक जणांनी या व्हिडीओला लाइक केलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla temjen imna along viral speech minister says by looking at me some may believe naga people eat humans scsg