BJP MLA Shows Go Back Modi Card Viral: लाइटहाऊस जर्नलिझमला भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि भाजपा आमदार वनाथी श्रीनिवासन यांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. X म्हणजे पूर्वीच्या ट्विटरवर लोकांनी हा फोटो आपल्या प्रोफाईलवर विविध दाव्यांसह शेअर केला आहे. आपण पाहू शकता की यात एक महिला हातात पांढऱ्या रंगाचे पोस्टर घेऊन उभी आहे ज्यावर काळ्या अक्षरात ‘गो बॅक मोदी’ असे लिहिले आहे. मागे महादेवांचा एक भव्य दिव्य पुतळा दिसत आहे, जो आदियोगी म्हणून ओळखला जातो. हे ठिकाण कोयम्बतूर येथे स्थित सद्गुरू यांचे आश्रम हे आहे. विशेष म्हणजे ही पोस्ट शेअर करताना श्रीनिवासन यांनी टीका केल्याचे अधोरेखित करण्याऐवजी अनेकांना ही टीका थेट सद्गुरू यांच्या आश्रमाच्या ठिकाणहून केली जात असल्याचे आश्चर्य वाटत आहे. हा फोटो खरा असला तरी त्यातील एक सर्वात मोठी चूक आता समोर आली आहे.
काय होत आहे व्हायरल?
X यूजर Urban Shrink ने व्हायरल चित्र आपल्या प्रोफाइल वर शेअर केले.
निवडणुकांदरम्यान, मागील काही महिन्यांमध्ये अनेक प्रोफाइलद्वारे हा फोटो शेअर केला गेला होती, यात ‘तामिळनाडूरिजेक्ट्सबीजेपी’ असा मजकूर देखील होता.
तपास:
आम्ही इमेजवर रिव्हर्स इमेज सर्च चालवून आमचा तपास सुरू केला. आम्हाला वनाथी श्रीनिवासन यांच्या अधिकृत X हँडलवर पोस्ट केलेला फोटो आढळला. हा फोटो २४ ऑक्टोबर २०२१ रोजी पोस्ट केला गेला होता. या चित्रातील फलकावर लिहिले होते की, ‘India creates history of 100 crore vaccinations. Thank you Modi ji’.
ऑक्टोबर २०२१ मध्ये, भारताने कोविड-19 लसीकरण मोहिमेत १०० कोटींचा टप्पा गाठला होता. “२१ ऑक्टोबर २०२१ चा हा दिवस इतिहासात नोंदवला गेला आहे. भारताने काही काळापूर्वी १०० कोटी लसीच्या डोसचा टप्पा ओलांडला आहे,” असं पीएम मोदी तेव्हा म्हणाले होते.
आदियोगी पुतळ्याच्या परिसरात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा व्हिडीओही आम्हाला पाहायला मिळाला. भाजपा दिंडीगुल जिल्ह्याच्या यूट्यूब चॅनेलने हा व्हिडीओ अपलोड केला होता.
निष्कर्ष: भाजपा नेते वनाथी श्रीनिवासन यांचा जुना, एडिट केलेला फोटो व्हायरल होत आहे. एडिटेड चित्रात त्या ‘गो बॅक मोदी’ प्लेकार्ड घेऊन उभ्या असल्याच्या दिसत आहेत पण व्हायरल दावा खोटा आहे.