Loksabha election 2024 poster viral: सध्या देशभरात लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. फक्त भारतात नव्हे तर तब्बल ६४ देशांमध्ये निवडणुकांचं बिगूल वाजणार आहे. जगाच्या लोकसंख्येच्या जवळपास निम्मी माणसं निवडणुकीला सामोरं जाणार आहेत. निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष असून सर्वत्र लोकसभेचीच चर्चा सुरु आहे. दरम्यान निवडणुकांच्या याच रणधुमाळीत एक पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पोस्टर पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल. मात्र याच पोस्टरमधून खरंतर सध्याचं वास्तव मांडण्यात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“झाडे लावा झाडे जगवा” हे घोषवाक्य फक्त आता बोलण्यापूर्तीच राहिलं आहे. कारण हल्ली झाडं लावण्यापेक्षा त्यांची कत्तलच मोठ्या प्रमाणात होते. या पोस्टमधून आगळ्या वेगळ्या पद्धतीनं झाडांचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाडांच्या संवर्धनासाठी आगळा वेेगळा संदेश देण्यात आला आहे. आता तुम्ही म्हणाल असं काय लिहलं आहे पोस्टरवर? तर या पोस्टरवर “भाजप येणार? काँग्रेस येणार? आरं खुळ्या दारात दोन झाडे लाव सावली मात्र नक्की येणार” असा आशय लिहला आहे.

हे पोस्टर येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत आहे. पोस्टरचा हा फोटो व्हायरल होत असून लोक आणखी शेअर करत आहे. झाडांच्या कत्तलीमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले असून, त्याचे दुष्परिणाम आता बघावयास मिळत आहेत. अशात जास्तीत जास्त झाडे लावणे ही काळाची गरज आहे. झाडे लावणे नव्हे, तर त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे हीसुद्धा आम्हा सर्वांची जबाबदारी आहे

पाहा पोस्ट

हेही वाचा >> शेवटी बापाचं काळीज; लेकीच्या लग्नात आर्मी ऑफिसर धायमोकलून रडला; VIDEO पाहून येईल डोळ्यात पाणी

हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. एका युजरने प्रतिक्रिया दिली आहे की, एकदम बरोबर. तर दुसऱ्या युजरने “जल है तो कल है. एक झाड प्रत्येकानं लावलं पाहिजे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp or congress which party won highest seats in loksabha election save tree poster viral on social media srk