भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार किरोडी लाल मीणा यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक माकड भाजप खासदाराच्या खांद्यावर बसून अगदी ऐटीत फिरताना दिसत आहे. खासदार किरोडी लाल मीणा ज्या ठिकाणी जातायत त्या ठिकाणी हे माकड त्यांच्यासोबत दिसतेय. ज्याचे काही व्हिडीओ मीणा यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले आहेत. यातून माकड आणि खासदार किरोडी लाल मीणा यांच्यातील न्यारी मैत्री अनेकांना पाहायला मिळाली.
खासदार किरोडी लाल मीणा दौसाच्या नांगल प्यारी वास येथील मीणा उच्च न्यायालयाच्या आवारात पोहोचले होते. जिथे लोकांना एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. खासदार किरोडी लाल मीणा यांची गाडी मंडवार रेल्वे फाटकाजवळ पोहोचली तेव्हा फाटक बंद होते. याचदरम्यान खासदारांच्या गाडीतील एक माकड बाहेर आले आणि खोड्या करू लागले. हे माकड खासदारांच्या अंगाखांद्यावर अगदी आरामात खेळताना दिसले. हे माकड बराच वेळ त्यांच्या खांद्यावर बसून खेळत राहिले. इतकेच नाही तर खासदार मीणा यांच्या गाडीत जाऊन ते उड्या मारू लागले. ज्यानंतर चक्क मीणा यांच्या मांडीवरही अगदी आरामात जाऊन बसले.
किरोडी लाल मीणा यांनी शेअर केला व्हिडीओ
राज्यसभा खासदार किरोडी लाल मीणा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून माकडासोबतचे व्हिडीओ शेअर केले आहेत. यासह कॅप्शनमध्ये त्यांनी एक संस्कृत श्लोकदेखील लिहिला आहे. तसेच त्यांनी राम आणि हनुमानाची कृपा असल्याचे सांगितले आहे. यानंतर सोशल मीडियावर युजर्सनी या व्हिडीओवर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली.
खासदाराने व्हिडीओ शेअर करत लिहिले की…
माकडासोबतच्या या मैत्रीचे काही व्हिडीओ शेअर करत किरोडी लाल मीणा यांनी लिहिले की, नमो मार्कटाधिशाय श्रीरामप्रियाय श्रीहनुमते. प्रत्येक जीवात देवाचा वास असल्याचे सांगणाऱ्या भारतीय संस्कृतीत माकडाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारतीय लोक भगवान श्रीरामाच्या धार्मिक युद्धात मदत करणाऱ्या माकडाची भगवान हनुमान म्हणून पूजा करतात. आज माझ्यावरही हनुमानजींची कृपा झाली. जय बजरंग बली.
वास्तविक ९ ऑगस्ट हा आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त दौसा जिल्ह्यातील मीणा उच्च न्यायालयात जोरात तयारी सुरू आहे. खासदार किरोडी लाल मीणा याच तयारीचा आढावा घेण्यासाठी आले होते, तेव्हा त्यांच्यासोबत हे माकडही दिसले.