BJP vs Congress, Fight on Tv: लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय नेते, प्रचारक, समर्थक शक्य त्या सर्व पद्धतीने आपली बाजू वर उचलून धरण्याचा प्रयत्न करत आहेत. याच प्रयत्नातून अनेकदा शाब्दिक वाद आणि काही वेळा हाणामारीचे प्रसंग सुद्धा यापूर्वी घडले आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लाइटहाऊस जर्नलिझमला आढळलेल्या या व्हिडीओमध्ये टीव्हीवरील लाईव्ह वादविवाद कार्यक्रमाच्या दरम्यान पॅनेलमधील पाहुणे एकमेकांशी भांडताना दिसले. हे उपस्थित मान्यवर मणिपूरमधील भाजप आणि काँग्रेसचे सदस्य होते असा दावा करून ही क्लिप शेअर होत आहे. राजकीय स्थिती पाहता अशा प्रकारची भांडणे नवीन नसली तरी या व्हिडीओमध्ये मात्र एक मोठी चूक आहे, ती काय हे आता आपण पाहूया..

काय होत आहे व्हायरल?

X यूजर Essie Naga ने व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

hindenburg questions sebi chief madhabi buch s silence amid congress claims
सेबी अध्यक्षांवर नव्याने आरोप;प्रतिसादशून्य मौनावरही ‘हिंडेनबर्ग’कडून प्रश्न
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
sam pitroda statement on rahul gandhi
VIDEO : “राहुल गांधी ‘पप्पू’ नाहीत, तर…”; सॅम पित्रोदांचे विधान चर्चेत!
ed file case against four people including executive chairman of religare
ईडीच्या तक्रारीवरून ‘रेलिगेअर’च्या कार्यकारी अध्यक्षांसह चौघांविरोधात गुन्हा, बर्मन कुटुंबाविरोधात खोटी माहिती दिल्याचा आरोप
bangladesh seeks extradition of ex pm sheikh hasina
शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाचे प्रयत्न; विद्यार्थी आंदोलनादरम्यान सामूहिक हत्याकांडाचा आरोप
PM Modi participate in Lakhpati Didi Sammelan at Jalgaon
मुख्यमंत्र्यांच्या मागण्यांकडे पंतप्रधानांचे दुर्लक्ष; शेतकऱ्यांविषयी प्रश्नांबाबत भाषणात अवाक्षरही नाही
Ragini Nayak, Congress Spokesperson Ragini Nayak, ragini nayak critices mohan bhagwat, Mohan Bhagwat, Narendra Modi, anti women, Badlapur incident
‘संघप्रमुखांना केवळ विजयादशमीला ‘नारी-शक्ती’ आठवते, मोदींचे मौनही संतापजनक…’ काँग्रेसच्या प्रवक्त्याने……
Mumbai, Badlapur Case,Suspended police Officer, Shubhada Shitole Shinde Transferred , assembly elections, police transfers, senior police inspectors
बदलापूर प्रकरणात निलंबित पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे- शिंदे यांच्यासह ठाण्यातील १४ पोलीस निरीक्षकांची मुंबईत बदली

इतर वापरकर्ते देखील असाच दावा करत व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही InVid टूलमध्ये व्हिडिओ अपलोड करून आमचा तपास सुरू केला. याद्वारे आम्हाला अनेक कीफ्रेम्स मिळाल्या आणि मग आम्ही एकामागून एक कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च केले.आम्हाला news.com.pk च्या वेबसाइटवर एक बातमी सापडली, ज्याचे शीर्षक होते: Watch: Participants get into fight live on Afghanistan TV

https://www.thenews.com.pk/latest/434058-watch-participants-get-into-fight-live-on-afghanistan-tv

अहवाल १९ फेब्रुवारी २०१९ रोजी अपलोड करण्यात आला होता. आम्हाला सात वर्षांपूर्वी YouTube चॅनेलवर अपलोड केलेला व्हिडिओ देखील सापडला. व्हिडिओचे शीर्षक होते: अफगाण टीव्हीवरील लाईव्ह कार्यक्रमात हाणामारी

आम्हाला redd.tube वर अपलोड केलेला व्हिडिओ देखील सापडला, ज्याचे क्रेडिट 1tv काबुलला देण्यात आले होते.

https://www.redd.tube/video/d690b05a01e4d4be25a505a05d87922e41a4db52

त्यानंतर आम्ही 1TV काबुलच्या YouTube चॅनेलवर व्हिडीओ शोधला. आम्हाला त्यांच्या YouTube चॅनेलवर सात वर्षांपूर्वी अपलोड केलेला २६ मिनिटांचा व्हिडीओ सापडला.

व्हिडिओच्या शेवटी, पॅनेलमधील दोन सदस्य रागाने एकमेकांना मारायला उठल्याचे दिसतेय. युट्यूब व्हिडिओच्या शीर्षकात नमूद केल्याप्रमाणे हेकमतयार अफगाण सरकारच्या कार्यक्रमातील ही वादग्रस्त चर्चा होती.

अफगाणिस्तान सरकारने २०१६ मध्ये कुख्यात निर्वासित सरदार गुलबुद्दीन केकमात्यार यांच्याशी शांतता कराराच्या मसुद्यावर स्वाक्षरी केली, ज्यामुळे अनेक वर्षे केंद्रीय अधिकाऱ्यांशी संघर्ष केल्यानंतर त्यांच्या परतीचा मार्ग मोकळा झाला. या व्हायरल चर्चांदरम्यान, २०१९ मधील भारताचा व्हिडिओ देखील शेअर केला जात आहे.

आशुतोष राणा यांचा भाजपला पाठिंबा? ‘तू वोट कर’ म्हणत केलं जनतेला आवाहन, पण तुम्हाला ‘ही’ चूक दिसली का?

निष्कर्ष: सात वर्षांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये लाईव्ह टीव्हीवरील चर्चेदरम्यान पॅनेलच्या सदस्यांमधील झालेले भांडण, आता मणिपूरमधील भाजप आणि आयएनसी सदस्यांमध्ये भांडण झाल्याचे सांगून व्हायरल केले जात आहे. व्हायरल दावे खोटे आहेत.