Viral Post: भारतात गाड्या आणि त्यामागील स्लोगन खूप व्हायरल होतात. गाड्यांच्या मागे वेगवेगळ्या प्रकारच्या पाट्या पाहून, या सगळ्याच गाड्या पुण्याच्याच आहेत की काय, असाही प्रश्न पडतो. ‘मेरा भारत महान’ आणि ‘हॉर्न ओके‘ तर जवळजवळ प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेलंच असतं. त्याशिवाय काही ट्रकवाले, ऑटोचालकांच्या आत लपलेली कला याच पाट्यांद्वारे दिसून येते. जसं की, शेरो शायरी, म्हणी, टोमणे. दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणूनही गाड्यांच्या मागे अशी वाक्यं लिहिणं हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे. दरम्यान, अशाच एका रिक्षाचा मागे लिहिलेलं वाक्य सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. या रिक्षाचा फोटोही सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही होतोय. त्यावर महिलांच्या समानतेबाबत लिहिलेल्या ओळींमुळे सोशल मीडियावर वादाला तोंड फुटलं आहे.
बंगळुरू हे भारतातील अतिशय प्रसिद्ध शहर आहे. पण, काही दिवसांपासून सोशल मीडियावर बेंगळुरूचे नाव वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. कधी हिंदी आणि कन्नड भाषेतील वाद, तर कधी महिला ऑटोचालकाशी झालेलं गैरवर्तन याशिवाय अशा अनेक घटना अलीकडच्या काळात घडल्या आहेत. दरम्यान, आता रिक्षाच्या मागे लिहिलेल्या या संदेशामुळे पुन्हा एकदा बंगळुरू चर्चेत आहे. या ऑटोचालकाने आपल्या ऑटोच्या मागे असा संदेश लिहिला आहे की, तो पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, त्या रिक्षाच्या मागे, असं लिहिलंय तरी काय? रिक्षाच्या मागे लिहिलेला संदेश वाचून कदाचित तुम्हालाही राग येईल.
काय लिहलंय रिक्षाच्या मागे?
बेंगळुरूमधील एका ऑटोचालकाने त्याच्या ऑटोच्या मागे लिहिले आहे, “महिला ही स्लिम असो किंवा फॅट, काळी असो किंवा गोरी, व्हर्जिन असो किंवा नसो सगळ्यांना आदर दिलाच पाहिजे” हा मेसेज पाहिल्यानंतर सोशल मीडियावरही चर्चेला उधाण आले आहे. ऑटोचालकाच्या या मेसेजचे अनेक जण कौतुक करीत आहेत. तर, अनेकांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, त्याच्यावर टीका केली आहे. रिक्षाच्या मागे लिहिलेला संदेश पाहून तुम्हीच सांगा, तुम्हाला हे पटलं का?
पाहा रिक्षा
हेही वाचा >> “बाईईई हा काय प्रकार” लावणीवर ठेका धरणाऱ्या गौतमी पाटीलला गरबा येतो का? VIDEO पाहून तुम्हीच सांगा
व्हायरल होत असलेली ही पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @kreepkroop नावाच्या अकाउंटसह शेअर करण्यात आली आहे. ही पोस्ट आतापर्यंत ९२.२ हजारांहून अधिक लोकांनी पाहिली आहे. त्यावर लोकांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एका वापरकर्त्यावर टिप्पणी करताना त्यानं लिहिलं, “एवढं लिहिण्यापेक्षा सरळ लिहा- सर्व महिला समान.” आणखी एकानं म्हटलंय, “चांगल्या उद्देशानं घ्या.”