कर्नाटकच्या जंगलांमधील ब्लॅक पँथरचे काही भन्नाट फोटो काही दिवसांपूर्वी इंटरनेटवर चांगलेच चर्चेत आले होते. वाइल्ड लाइफ फोटोग्राफर असणाऱ्या शहाझ जंग यांनी काढलेले हे फोटो काबीनी जंगलांमधील होते. इंटरनेटवर हे फोटो व्हायरल झाले होते. नेटकरी या फोटोंच्या प्रेमात पडले आणि त्यांना जंगल बुकची आठवणी झाली होती. जंगल बुकचे लेखक रुडयार्ड किपलिंग यांच्या कथेत बगीरा नवाचा ब्लॅक पँथर मोगलीला जंगलामध्ये घेऊन येतो आणि त्याला जंगलातील राहणीमान शिकवतो. त्यामुळेच काबीनीच्या जंगलातील ब्लॅक पँथरला पाहून अनेकांनी त्याला बगीरा म्हटलं होतं. ती बातमी तुम्ही येथे वाचू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे फोटो व्हायरल झाल्यानंतर शहाझने या फोटोंबद्दलची माहिती दिली होती. हे फोटो काढण्यासाठी शहाझला जवळजवळ पाच वर्षे वाट पहावी लागली होती. रोज १२ तास ब्लॅक पँथरला ट्रॅक केल्यानंतर काही फोटो मिळायचे. हा पँथर चार ते पाच वर्षांचा असून त्याने मला संयम काय आहे हे शिकवल्याचं शहाझ सांगतात.

नक्की पाहा >> कोणी म्हणतं ब्लॅक ब्यूटी तर कोणी बगीरा… खरोखरच या फोटोंवरुन तुमची नजर हटणारच नाही

या फोटोंबद्दल अजूनही नेटवर चर्चा सुरु असतानाच याच काबीनीच्या जंगलातील आखणीन काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र या फोटोंमध्ये केवळ ब्लॅक पँथर नसून त्याच्या सोबत एक जोडीदारही आहे. सध्या काबिनीच्या जंगताली व्हायरल झालेल्या फोटोमध्ये ब्लॅक पँथर हा बिबट्याच्या मागे उभा असल्याचे दिसत आङे. हे फोटो मिथून एच. या वाईल्ड लाइफ फोटोग्राफरने काढलेले आहेत. हे दोन्ही सुंदर प्राणी एकाच फ्रेममध्ये एकाच पोजमध्ये टिपण्यासाठी मिथून यांना सहा दिवसांचा कालावधी लागला.

या फोटोसंदर्भात मिथून यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सविस्तर माहिती दिली आहे. ‘The Eternal Couple’ म्हणजेच शाश्वत जोडपे या नावाने एक पोस्ट लिहीत मिथून यांनी या फोटोसंदर्भातील माहिती दिली आहे. “साया आणि सेलोपात्रा हे दोघे मागील चार वर्षांपासून एकत्र फिरत आहेत. ते जेव्हा त्यांच्या या राज्यात चालू लागतात तेव्हा जंगलाला जणू काही जाग येते. जेव्हा असे प्राणी जोडीने जंगलामध्ये फिरतात तेव्हा नर हा पुढाकार घेत पुढे चालतो आणि मादी त्याच्या मागे चालते. मात्र या जोडप्याचं जरा वेगळं आहे. इथे मादी (बिबट्या) सेलो पुढे चालते आणि साया (पँथर) तिच्या मागून चालतो. हा फोटो मी हिवाळ्यामध्ये काढला आहे. हरिणांच्या कळपाने मला यांच्या येण्यासंदर्भात संकेत दिल्यानंतर मला हा फोटो काढता आला,” अशी कॅप्शन मिथून यांनी दिली आहे.

नक्की पाहा >> एकमेवाद्वितीय! भारतामध्ये पहिल्यांदाच आढळला ‘हा’ सुंदर प्राणी; पाहून व्हाल थक्क

मिथुन यांनी काढलेला हा फोटो इन्स्टाग्रामबरोबरच ट्विटरवर आणि फेसबुकवरही व्हायरल झाला आहे.