Viral video: ब्लॅक पँथर ही बिबट्यांची अत्यंत दुर्मिळ प्रजाती आहे. खोल जंगलात राहणाऱ्या या वाघाचं क्वचितच दर्शन होतं. त्यामुळे हा काळा बिबट्या पाहायला देखील नशीब लागतं असं म्हटलं जातं. परंतु अशा या दुर्मिळ बिबट्या ओडिशामध्ये दिसला असून त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर अनेक प्राण्यांचे व्हिडीओ पहायला मिळतात. आजकाल वन्य प्राण्यांच्या व्हिडीओला नेटकऱ्यांची चांगली पसंती मिळत आहे. प्राण्यांशी संबंधीत व्हिडीओ कायमच चर्चेत असतात. वन्य प्राणी आता हळूहळू मानवी वस्तीकडे येत असून त्यांच्या हल्ल्याचेही बरेच व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत.
या फोटोमध्ये बिबट्या जितका खतरनाक दिसतोय तितकाच तो सुंदरही दिसतोय. तो बिनधास्त आणि बेधडकपणे जंगलात फिरत आहे. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस अधिकारी परवीन कासवान यांनी ब्लॅक पँथरचे फोटो एक्सवर शेअर केले आहेत.
कातडीचा रंग त्वचेतील “मेलनिन’ या रंगद्रव्यावर अवलंबून असतो. या द्रव्याचे प्रमाण जास्त झाल्यास, कातडी काळी किंवा गडद रंगाची होते. काळ्या बिबट्याच्या बाबतीत हेच होते. त्याच्या शरिरात “मेलनिन’चे प्रमाण जास्त असल्यामुळे तो काळा किंवा गडद रंगाचा होतो. त्याच्या शरिरारवर नेहमीच्या बिबट्याप्रमाणे काळे ठिपके असतात, पण गडद रंगामुळे ते अगदी जवळ गेल्याशिवाय दिसू शकत नाहीत. या रंगबदलामुळे प्राण्याच्या वर्तणुकीत किंवा स्वभावात काही फरक पडत नाही.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> Video: शॉर्टकट जीवावर बेतला! नागपूर-तुळजापूर महामार्गावर काळजाचा ठोका चुकावणारा अपघात; पती-पत्नी हवेत उडून…
दरम्यान, जंगलातील प्राण्यांचे असे अनेक फोटो समोर येत असतात. त्यांच्या थराराक व्हिडीओंना नेहमीच नेटकऱ्यांची पसंती असते. आत्तापर्यंत असे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. लोकांना वन्य जीवन, प्राणी, यांमध्ये जास्त रस असल्यामुळे ते असे व्हिडीओ वारंवार पाहतात.