Black Saree Student Viral Video: शाळा- कॉलेजच्या शेवटच्या दिवशी ना अशी हवा करू की सर- मॅडम बघतच बसतील अशी एक इच्छा प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात असते. अर्थात हवा करायची म्हणजे बेंच तोडणे, बल्ब फोडणे, बोर्ड्सवर काहीतरी चित्र काढणे असा अर्थ काढणाऱ्या अवलियांची संख्या जास्त असते. पण तरी काही असे विद्यार्थी असताना ज्यांना शिक्षकांना भेटवस्तू देऊन, त्यांच्यासाठी कविता करून, एखादा डान्स करून हा शेवटचा दिवस साजरा करायचा असतो. विचार वेगळे असले तरी हे दोन्ही गट त्या त्या वर्गाची शान असतात हे मान्य करावंच लागेल. सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये या दोन्ही गटाचं प्रतिनिधित्व करणारी एक विद्यार्थिनी बघायला मिळतेय. कॉलेजच्या शिक्षिकांसमोर साडी नेसून तिने केलेला पराक्रम पाहून शिक्षकांच्या चेहऱ्यावर जो काही भाव आलाय तो तर खरोखर पाहण्याजोगा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल व्हिडीओमध्ये बघून अंदाज येतोय की एका कॉलेजच्या फेअरवेल किंवा पारंपरिक दिनाच्या निमित्ताने सगळे गोळा झाले आहेत. एका सोफ्यावर तीन शिक्षिका बसलेल्या आहेत. अन्य विद्यार्थ्यांचा आजूबाजूला गोंगाट आहे. इतक्यात रील बनवण्याच्या हेतूने एक साडी नेसलेली विद्यार्थिनी तिथे येते. तिची कुणीतरी मैत्रीणच कदाचित हा व्हिडीओ शूट करत असावी कारण घडलेला प्रकार हा ठरवून केल्यासारखाच वाटतोय. शिक्षिकांना आधी काय चालू आहे याचा थांगपत्ता नसतो पण तितक्यात ही काळी साडी नेसलेली विद्यार्थिनी चक्क उलटी उडी मारते. तिला हवेत पाहून इथे शिक्षकांचं काळीज अक्षरशः हातात येतं. हाताचा आधार घेत जेव्हा विद्यार्थिनी पुन्हा सरळ उभी राहते तेव्हा आपल्या मॅडमची प्रतिक्रिया बघून ती पण हसायला लागते.

तुम्हीही पाहा ‘या’ विद्यार्थिनीची कमाल

हे ही वाचा<< पुण्याच्या शाळेत विद्यार्थिनी हवेत अर्धवट तरंगायला लागली? मित्रांनी सांभाळण्याचा प्रयत्न करताच..Video पाहून भरेल धडकी

हा व्हायरल व्हिडीओ @shalugymnast या अकाउंटवर शेअर करण्यात आला होता. यामध्ये काळ्या साडीत उलटी उडी मारणाऱ्या विद्यार्थिनीचं नाव शालू असे आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून याला ८ लाख ४२ हजाराहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. यावर अनेकांनी शालूचं कौतुक करत कमेंट्स केल्या आहेत. आमिर खानच्या दंगल चित्रपटातील डायलॉग “म्हारी छोरीया छोरो से कमी है क्या?” असं म्हणत अनेकांनी कमेंट केल्या आहेत. शिक्षिकांना शेवटच्या दिवशी अटॅक येईल असा प्लॅन होता का असा खोडकर प्रश्नही एकाने गमतीत केला आहे.