Blinkit delivering iPhone 16 in 10 minutes: अ‍ॅपलने ९ सप्टेंबरला अ‍ॅपल ग्लोटाइम २०२४ इव्हेंटदरम्यान iPhone 16 सीरिज लाँच केली. या नव्या आयफोनची प्री-बुकिंग गेल्या आठवड्यात १३ सप्टेंबरपासून सुरू झाली असून आजपासून (२० सप्टेंबर) भारतासह काही देशांत याची विक्री सुरू झाली आहे. आयफोन खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच देशभरातील अ‍ॅपल स्टोअर्सबाहेर ग्राहकांच्या भल्यामोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत. तर ज्यांना स्टोअर्समधून आयफोन घेणं शक्य नाही त्यांनी आयफोन ऑनलाइन ऑर्डर करायला सुरुवात केली आहे.

अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट अशा ई-कॉमर्स कंपन्यांकडून अनेक जण आयफोन आणि विविध कंपनींचे स्मार्टफोन खरेदी करत असल्याचं आपण ऐकलंच असेल. या वेबसाइटवरून कोणतीही वस्तू ऑर्डर केल्यावर ती अवघ्या एक ते दोन दिवसांत तुमच्या दारावर येते, पण आता आयफोनप्रेमींसाठी ब्लिंकिट (Blinkit) अवघ्या १० मिनिटांत आयफोनची घरपोच डिलिव्हरी करत आहे.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
amazon 15 minutes delivery
ॲमेझॉन आता ब्लिंकइट, झेप्टोला टक्कर देणार, १५ मिनिटांत वस्तू घरपोच मिळणार; कंपन्या क्विक कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करण्यास उत्सुक का?
All about the new wedding invite scam on WhatsApp
सायबरचोरांचे नवे शस्त्र… डिजिटल लग्नपत्रिका! फसवणूक कशी? खबरदारी कोणती?
Kalidas hirve , Vasai National Marathon Competition,
वसईत रंगली राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा, साताऱ्याचा कालिदास हिरवे विजेता
Australia bans social media for children under 16
ऑस्ट्रेलियाचं स्वागतार्ह पाऊल…
OnePlus introduces lifetime warranty against green line issue
Lifetime Warranty For Green Line : आता मोबाईलच्या स्क्रीनवर येणार नाही ‘ग्रीन लाइन’; OnePlus ने सर्व स्मार्टफोन्सला दिली लाईफटाइम वॉरंटी
Honda launches new Amaze
Honda Amaze : अपडेटेड सेडानचे ऑफलाइन बुकिंग सुरू; ४५ दिवसांपर्यंत फक्त १० लाख रुपयांपर्यंत करा खरेदी; पण फीचर्स काय असणार?

हेही वाचा… iPhone 16 लाँच होताच अ‍ॅपलने बंद केले ‘हे’ बहुचर्चित आयफोन्स, नेमके कारण काय? घ्या जाणून

ब्लिंकिटकडून अवघ्या १० मिनिटांत आयफोन १६ची डिलिव्हरी (Blinkit delivering iPhone 16 in 10 minutes)

नवीन लाँच झालेला iPhone 16 आणि त्याची सीरिज ब्लिंकिट अवघ्या काही मिनिटांतच ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहे. इथे ग्राहकांनी ऑर्डर प्लेस केली की ब्लिकिंटच्या नियमानुसार केवळ १० मिनिटांतच ऑर्डर डिलिव्हर केली जातेय.

आज ब्लिंकिटचे संस्थापक अल्बिन्दर ढींढसा यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट शेअर करत लिहिलं की, “आम्ही सकाळी ८ वाजल्यापासून आयफोनची डिलिव्हरी करत आहोत आणि आता दोन मिनिटातच आम्ही ३०० चा टप्पा पार करणार आहोत.” तसंच आजचा दिवस एक क्रेझी दिवस असणार आहे, असंही ते म्हणाले.

अल्बिन्दर ढींढसा असंही म्हणाले की, “आम्ही युनिकॉर्न इन्फोसोल्यूशन्सबरोबर सलग तिसऱ्या वर्षी लेटेस्ट iPhone उपलब्ध करून देण्यासाठी पार्टनरशिप करत आहोत. दिल्ली एनसीआर, मुंबई, पुणे, बेंगळुरू आणि लखनऊमधील ग्राहकांना काही मिनिटांतच iPhone 16ची डिलिव्हरी मिळू शकते. तसंच या डिलिव्हरीची जबाबदारी ब्लिंकिट हाताळत असताना, युनिकॉर्न निवडक कार्डसवर सवलत प्रदान करते आहे आणि EMI पर्यायदेखील ऑफर करते आहे.”

आयफोन 16 मॉडेल

iPhone 16 सीरिजमध्ये आयफोन १६ (iPhone 16) (बेस मॉडेल), आयफोन १६ प्लस (iPhone 16 Plus), आयफोन १६ प्रो (iPhone 16 Pro) आणि आयफोन १६ प्रो मॅक्स (iPhone 16 Pro Max) यांचा समावेश आहे. आयफोनच्या प्रो मॉडेल्समध्ये Apple चा आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. आयफोन १६ प्रो मध्ये 6.3 इंच तर आयफोन १६ प्रो मॅक्समध्ये 6.9 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या डिव्हाईसेसमध्ये सर्वात पातळ बॉर्डर्स (Thinnest Borders) आहेत आणि यात अॅडव्हान्स ऑलवेज-ऑन 120Hz प्रोमोशन डिस्प्ले टेक्नॉलॉजीदेखील असणार आहे.

आयफोन 16 फीचर्स

डार्क ब्लॅक टायटॅनियम, ब्राइट व्हाइट टायटॅनियम रंगांव्यतिरिक्त, आयफोन 16 प्रोमध्ये आतापर्यंत अनुभवलेली सगळ्यात बेस्ट बॅटरी लाईफ असणार आहे. तसेच हे ऑप्टीमाईझ पॉवर मॅनेजमेंट आणि लार्जर बॅटरीजमुळे शक्य झालं आहे, तर आयफोनच्या कॅमेरा सिस्टिममध्ये सेकंड जनरेशन क्वाड पिक्सेल सेन्ससह ४८ मेगापिक्सेल फ्यूजन कॅमेरा येतो. हा नवा ४८ मेगापिक्सल अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि ५ x टेलिफोटो लेन्समुळे युजर्सचा फोटो काढण्याचा अनुभव आणखी खास होणार आहे.

Story img Loader